Anjuna Theft: गोव्यात सुपर मार्केटमध्ये केली चोरी, थेट सापडला नेपाळ बॉर्डरवर; संशयिताला 6 दिवसांची पोलीस कोठडी

India Nepal Border Arrest: स्टारको जंक्शन, हणजूण येथे एका सुपर मार्केटमध्ये चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला भारत-नेपाळ सीमेवर पलायनच्या तयारीत असताना त्याला अटक केली.
Anjuna Police Arrest Suspects
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: स्टारको जंक्शन, हणजूण येथे एका सुपर मार्केटमध्ये चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला भारत-नेपाळ सीमेवर पलायनच्या तयारीत असताना त्याला अटक केली. पृथ्वी ऊर्फ आशिष मिजार (२८, नेपाळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

सदर चोरीची घटना ही १७ जुलै रोजी, मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी सुपर मार्केटचे मालक इयान डिसोझा यांनी फिर्याद दिली होती. या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या सुपर मार्केटमध्ये २५-३५ वयोगटातील दोघांनी मार्केटच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीची ग्रिल कापून आतमध्ये प्रवेश केला.

Anjuna Police Arrest Suspects
Goa Theft: भरदिवसा मंगळसूत्र हिसकावले, आरोपी निघाला निलंबित पोलिस! गाडी क्रमांकही बनावट; युवकाच्या सतर्कतेमुळे अटक

संशयितांनी आपला चेहरा ओळखता येऊ नये म्हणून मास्क परिधान केले होते. या संशयितांनी मार्केटमध्ये विविध जागी ठेवलेली रोख तब्बल १.९० लाख रुपये लंपास केले. संशयितांनी मध्यरात्रीच्या वेळी ही चोरी अमलात आणली.

Anjuna Police Arrest Suspects
Pernem Theft: पेडण्यात दिवसाढवळ्या घरफोडी; 4.5 लाखांचा ऐवज लंपास, घर बंद असताना मारला डल्ला

तपासाअंती पोलिसांनी संशयिताचा शोध घेत, पृथ्वी याला भारत-नेपाळ सीमेवर ताब्यात घेतले. त्याला सोमवारी हणजूण पोलिस स्थानकावर आणण्यात आले. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com