Pernem Nurse Stabbed Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आधी दबा धरुन बसला, मग चाकूने सपासप वार केले! तुयेत नर्सवर तरुणाचा जीवघेणा हल्ला; प्रेमप्रकरणाचा संशय

Pernem Nurse Stabbed: मंगळवारी सायंकाळी पाचच्‍या सुमारास संशयित गौतम हा आरोग्यकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसला होता. परिचारिका ड्युटी संपवून बाहेर येताच त्याने अचानक धारदार चाकूने सपासप पाच ते सहा वार केले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: पेडणे तालुक्यातील तुये सामुदायिक आरोग्य केंद्राबाहेर ड्युटी संपवून घरी निघालेल्या विघ्नाली कुबल (२४) या परिचारिकेवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी गौतम उदय देविदास (रा. कोरगाव, मूळ तिस्क-उसगाव) याला अटक केली आहे. या हल्ल्यात परिचारिकेच्या डोक्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या असून तिच्‍यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाल्‍याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाचच्‍या सुमारास संशयित गौतम हा आरोग्यकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसला होता. परिचारिका ड्युटी संपवून बाहेर येताच त्याने अचानक धारदार चाकूने सपासप पाच ते सहा वार केले. गंभीर जखमी झालेली परिचारिका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

घटनेच्या वेळी उपस्थित नागरिक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत संशयिताला पकडून ठेवले. त्यानंतर पेडणे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्‍याला ताब्यात घेतले तसेच हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला. जखमी परिचारिका विघ्नाली हिच्‍यावर प्रथम तुये आरोग्यकेंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला गोमेकॉत हलविण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेनंतर आरोग्य केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोवा (Goa) फॉरवर्डचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुटकर यांनी या घटनेचा निषेध करत तुये परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे

तुये आयडीसी, इस्‍पितळ परिसरात पोलिसांनी गस्‍त वाढवावी. या भागात गुन्‍हे वाढले आहेत. पेडण्‍यात तीन पोलिस स्‍थानके, मोठ्या संख्‍येने अधिकारी आहेत. तरीही गुन्‍हे कमी होत नाहीत. सरकारने याची दखल घ्‍यावी. - दीपक कळंगुटकर (गोवा फॉरवर्ड)

भावाने घेतली पोलिसांत धाव

या प्रकरणी जखमी परिचारिकेचा भाऊ विघ्नेश कुबल (रा. वझरी) याने पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित गौतमविरोधात खुनी हल्ल्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.

पूर्वीही छळाची तक्रार; झाली होती अटक

परिचारिका विघ्‍नाली हिचा पाठलाग व त्रास दिल्याप्रकरणी संशयित गौतम याच्‍याविरुद्ध यापूर्वी पेडणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. पूर्वीच्या तक्रारी आणि सध्याच्या हल्ल्यात काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. प्रेमप्रकरणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT