Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

Goa Casino Honey Trap: ‘लडकी चाहिये का?’... एका प्रश्‍‍नातून सुरू होतो लुटीचा सापळा!
Goa Casino Honey Tra
Goa crimeDainik Gomantak
Published on
Updated on

‘लडकी चाहिये का?’... एका प्रश्‍‍नातून सुरू होतो लुटीचा सापळा! उत्तर गोव्यातील किनारी भागांत हे वाक्य आता गुन्हेगारीचे परवलीचे शब्द बनले आहेत. आमिषाला बळी पडलेल्या पर्यटकांना, श्रीमंत व्यक्तींना निर्जन ठिकाणी नेऊन लुटणे, मारहाण करणे, ब्लॅकमेल करणे आणि लाखो रुपये उकळणे, अशा घटना सातत्याने घडत आहेत.

तरीही बदनामी, कौटुंबिक प्रतिष्ठा आणि नाव उघड होण्याच्या भीतीने अनेक पीडित तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाहीत. त्यामुळे असंख्य प्रकरणे चार भिंतीआडच दडपली जातात. याच मौनावर अशा टोळ्यांची मक्तेदारी उभी राहते. ‘कॉल गर्ल’ किंवा ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या चक्राला खीळ घालायची असेल तर पीडितांना गोपनीयतेची हमी देणारी व तक्रार नोंदविण्यास प्रोत्साहन देणारी व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे. पीडित गप्प राहिले, तर गुन्हेगारांचेच फावणार.

Goa Casino Honey Tra
Goa Casino: गोव्यातील कॅसिनोचे कंबरडे मोडणार! आता 40 टक्क्यांपर्यंत भरावा लागणार 'जीएसटी', व्यवसाय कोलमडण्याची भीती

वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक संदीप सुवर्णा यांच्‍या मृत्‍यूच्‍या निमित्ताने राज्यातील कॅसिनो आणि रिसॉर्ट्सच्या छुप्या जगातील एक भयंकर वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पणजीतील मांडवी नदीत असलेले ऑफशोर कॅसिनो आणि लक्झरी हॉटेल्स ही अशा टोळ्यांची मुख्य केंद्रे राहिली आहेत. अक्षतासारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कथित महिलांचा विविध हाय-प्रोफाइल कॅसिनोंमध्ये नियमित वावर असतो. या महिला अत्यंत आधुनिक जीवनशैली, ग्लॅमर आणि सौंदर्याचा वापर करून कॅसिनोमध्ये येणाऱ्या अतिश्रीमंत पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

कॅसिनोच्या टेबलावर मोठी रक्कम लावणारे, गळ्यात-हातात सोन्याचे जड दागिने घालणारे आणि पैशांनी गच्च भरलेले पाकीट बाळगणारे पर्यटक या महिलांचे मुख्य टार्गेट असतात. अशा महिला अनोळखी श्रीमंत पुरुषांशी गोड बोलून आधी मैत्री वाढवतात आणि नंतर त्यांना आपल्या मोहाच्या जाळ्यात ओढून रिसॉर्ट किंवा हॉटेलच्या खोलीपर्यंत घेऊन जाण्यात कमालीच्या पटाईत असतात. अशा अनेक प्रकरणांमध्ये पर्यटकांना गुंगीचे औषध देऊन त्यांचे दागिने, रोख रक्कम किंवा महागड्या वस्तू चोरल्या जातात; तर काही प्रकरणांमध्ये आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ काढून नंतर मोठ्या रकमेसाठी ब्लॅकमेलदेखील केले जाते.

Goa Casino Honey Tra
Mandovi River Casino Dispute: मांडवीत नवीन कॅसिनो बोटसाठी कायदेशीर फिल्डिंग! "सर्व परवाने आमच्याकडे, परवानगी द्या"; व्यवस्थापनाचा हायकोर्टात दावा

पर्यटकांनी फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी पुढील गोष्टी पाळणे आवश्यक

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. समुद्रकिनारे, पब किंवा रस्त्यांवर मुली पुरवण्याचे किंवा मसाज पार्लरचे आमीष दाखवणाऱ्या दलालांपासून सावध राहा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा फसवणूक झाल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करा.निर्जन स्थळी जाणे टाळा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून रात्रीच्या वेळी अज्ञात किंवा निर्जन ठिकाणी जाऊ नका. तातडीने संपर्क करा.

बदनामीच्या भीतीने बळी पडतात श्रीमंत असामी...

यापूर्वीही अशा अनेक लुटमारीच्या आणि फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, समाजात आपली नाचक्की होईल, नाव खराब होईल किंवा घरी काय सांगायचे? या केवळ आणि केवळ लाजेपोटी अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक आणि बड्या घरचे श्रीमंत लोक पोलिसांत तक्रार देण्यास धजावत नाहीत. ते गपचूप मोठे आर्थिक नुकसान सहन करतात. पीडितांच्या याच भीतीचा गैरफायदा घेऊन अशा टोळ्यांचे आणि अक्षतासारख्या महिलांचे धाडस वाढते व त्या नव्या गुन्ह्यांना अंजाम देतात.

Goa Casino Honey Tra
Illegal Fishing Goa: परराज्‍यांतील 13 ट्रॉलर्स जप्‍त, गोव्‍याच्‍या समुद्रात घुसखोरी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाखांपर्यंत दंड

तक्रार दाखल; 'व्हिसेरा'अहवालाकडे पोलिसांचे लक्ष...

या प्रकरणी पोलिसांनी संशयित अक्षता उर्फ रूपाश्रीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, प्राथमिक अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी रासायनिक विश्लेषणासाठी ‘व्हिसेरा’ नमुना राखून ठेवला आहे. हा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच संदीप यांना नक्की काय दिले गेले होते आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, यावरून पडदा उठणार आहे. काही वेळा अशा गुन्ह्यांना वाचा फुटते, तर अनेकदा ही प्रकरणे लाजेपोटी दाबली जातात, हे किनारी परिसरातील एक कटू सत्य आहे.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात पर्यटकांची लूट

कॅसिनो व्यतिरिक्त किनारी भागात पर्यटकांना आकर्षित करून लुटण्यासाठी ‘दलाल आणि एस्कॉर्ट सर्व्हिस रॅकेट’ किंवा ‘हनी ट्रॅप’ची एक अत्यंत जुनी आणि कुप्रसिद्ध पद्धत सक्रिय आहे. गर्दीच्या किनारी भागात रात्रीच्या वेळी काही एजंट किंवा दलाल दुचाकीवरून अथवा रस्त्याच्या कडेला उभे राहून फिरतात.

Goa Casino Honey Tra
Panaji Casino Protest: 'गोव्यातून कॅसिनो हटवा'! पणजीवासियांनी आवळली मूठ; जनआंदोलन, न्यायालयीन लढा सुरु

हे दलाल मद्याच्या नशेत असलेल्या किंवा एकट्या पुरुष पर्यटकांना गाठून हळू आवाजात ‘लडकी चाहिए क्या’, ‘मसाज पार्लर’ किंवा ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’ अशी विचारणा करतात. पर्यटकाने होकार देताच त्याला मुलींचे फोटो दाखवून सौदा ठरवला जातो.

संबंधिताला अज्ञात स्थळी नेले जाते. पर्यटक तिथे पोहोचताच अचानक ४-५ स्थानिक गुंड किंवा स्वतःला तोतया पोलिस सांगणारे लोक तिथे धाड टाकतात. ‘तू इथे बेकायदेशीर कृत्य करत आहेस, तुला जेलमध्ये टाकू किंवा घरी फोन करू’, अशी धमकी देऊन पर्यटकाला मारहाण केली जाते.

Goa Casino Honey Tra
Goa Honey Trap Case: ‘हनी ट्रॅप’ प्रकरणी उद्योजकाला दिलासा! हायकोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

या भीतीपोटी पर्यटक स्वतःजवळील महागडा फोन, सोन्याचे दागिने, रोकड आणि एटीएम कार्ड गुंडांच्या हवाली करतो. अनेकदा ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे सक्तीने हजारो-लाखो रुपये उकळले जातात. क्‍लृप्‍त्‍या अनेक असतात, पण अखेर एकच! संबंधिताकडून पैसे लाटले जातात, दागिने काढून घेतले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com