मोरजी: मोपा ग्रिनफिल्ड आंतरविमानतळासाठी (Greenfield Airport) जमिनी गेलेल्या गावातील बेरोजगार तरूणाना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि परिसरात जे विमानतळासह जे प्रकल्प येतील त्यात स्थानिकाना रोजगार देणे हा स्थानिकांचा हक्क आहे. आणि त्यासाठी नागरिक आपल्या हक्कासाठी आज रस्त्यावर येवून चळवळ उभारत आहे.
अशा प्रकल्पातुन स्थानिकाना रोजगाराच्या (employment) संधी जर लोकप्रतिनीधी उपलब्द करून देऊ शकत नसतील तर बेरोजगाराना खोटी आश्वासने देऊन थट्टा करण्याचे लोकप्रतिनीधीनी थांबवावे. असे आवाहन जागृत वकील तथा पेडणे तालुका विकास नागरिक समितीचे निमंत्रक व्यंकटेश नाईक यांनी केले आहे.
पेडणे तालुका विकास समितीचे निमंत्रक व्यंकटेश नाईक यांनी पुढे बोलताना आमदाराची (MLA) स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारानी जर तर ची आश्वासने देऊन बेरोजगाराना खोट्या आश्वासनावर झुलवत ठेवुन बेरोजगाराचा गैरफायदा घेण्याचे टाळावे. त्यांचे विजन काय आहे ते जाहीर करावे.
संभाव्य येणारे प्रकल्प कोणते?
कसला रोजगार येणार आणि कोणत्याप्रकारचे कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे याचा अभ्यास न करता वर्तमान पत्रातुन फक्त कल्पीत बातम्या देऊन प्रसिध्दी मिळविण्यासाठी आणि बेरोजगारांची दीशाभुल करू नये.अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणुका (Elections) येईपर्यत लोकप्रतिनीधी आणि संभाव्य उमेदवार हा बेरोजगारीचा विषय प्रथम स्थानावर परत परत उपस्थित करत बेरोजगारांचे आपणच कैवारी आहोत अशा राणाभिमदेवी गर्जना करतील पण या तिन महिन्यात फक्त दिशाभुल करण्यासाठी आश्वासनापलीकडे कोणी काहीही करणार नाही. त्यासाठी पेडणेतील बेरोजगार युवकांनी त्यांच्यापासून संवाद राहण्याचे आवाहन केले.
मोपा विमानतळावर (airport) मॅकॅनिक विभाग कार्गो हाताळणी,व्यवस्थापकीय कामे,लाॅजिस्टिक वाहतुक असे वेगवेगळे विभाग असतीलच.
या विभागात कुशल कामगारांची गरज भासेलच.अशा कामासाठी बेसीक माहीती असलेले कुशल कामगारासाठीचे प्रशिक्षण काही हजारात देऊन रोजगार मिळवता येतो आणि असे प्रशिक्षणा देण्याची तयारी पेडणे तालुका विकास समिती पेडणे तालुक्यातील आपल्या बेरोजगार बांधवाना देण्याचा विचार करीत आहे आणि लवकरच पेडणे तालुका विकास समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री डाॅक्टर प्रमोद सावंत याची भेट घेऊन त्यानापेडणे तालुका विकास समिती ची भुमिका आणि भावी योजना स्पष्ट करणार आहे.
भुमिपुत्रावर अडीच लाख खर्च करून जर चांगल्या दर्जाच्या नोकरीची शाश्वती G M R पेडणे तालुक्यातील बेरोजगार देत असेल तर प्रथम प्रशिक्षण द्या आणि बेरोजगार युवकावर प्रशिक्षणासाठी केलेला अडीच लाख खर्च त्या भुमिपुत्र युवकाची त्याची सेवा त्या आस्थापनात असे पर्यंतच्या काळात मासिक कमीत कमी हप्याने कापुन घ्या अशी पर्यायी भुमिका घेतल्यास पेडणे तालुका विकास समिती भुमिपुत्र बेरोजगारांच्या पाठीसी उभी राहील असे पेडणे तालुका विकास समितीचे नेते व्यंकटेश नाईक यानी मागणी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.