'वडिलांचे पितृछत्र' हरवलेल्या मोरजी येथील विजया शेटगावकरची कहाणी..

‘फाईन आर्ट’ची पदवी घेऊन वडिलांचे आर्ट गॅलरीचे स्वप्न पूर्ण करण्याचा केला संकल्प
Goa Handicrafts विजया शेटगावकर
Goa Handicrafts विजया शेटगावकरDainik Gomantak
Published on
Updated on

Goa : आपल्या जाणत्या वयात घरची परंपरागत कला शिकून त्या कलेचा (Art) वारसा पुढे नेणारे अनेक कलाकार (Artist) आहेत. परंतु लहानपणीच वडिलांचे पितृछत्र हरवलेल्या मरडीवाडा, मोरजी (Morjim) येथील विजया शेटगावकर हिने आपल्या बालपणापासून कलेचे बीज स्वत:त जपले. ज्यावेळी वडील विविध वस्तू बनवायचे त्यावेळी तिने त्या हस्तकलेचे (Goa Handicrafts) बारकावे डोळ्यांनी नीट निरखून घेतले आणि शिक्षण घेत असताना त्या कलेचीही आराधना केली. आज विजया या मातीकलेत (Soil art) पारंगत बनली आहे.

Goa Handicrafts विजया शेटगावकर
हस्त कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतीला आता मिळणार 'न्याय'

वडिलांच्या अकाली निधनानंतर विश्वनाथ का. शेटगावकर यांच्या ‘शेटगावकर गॅलरीचे’ स्वप्न अपूर्ण राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. विजया आणि विश्वेता या दोन्ही बहिणींनी आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा आपल्या आईच्या सहाय्याने पुढे नेण्याचा निर्धार केला आणि त्या दिशेने पावले उचलली. विजया हिने ‘फाईन आर्ट’ची पदवी घेऊन वडिलांचे आर्ट गॅलरीचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

Goa Handicrafts विजया शेटगावकर
गोव्यात दिवाळीत फराळापेक्षा पोह्यांना मोठं महत्त्व

सध्या विजयाने दिवाळीच्या सणानिमित्ताने मातीपासून, पणती, जादू दिवा, बदक कासव, मोर, शिवलिंग, दिवा, घंटा, दही भांडे, पाणी बाटली, स्पीकर, पेन स्टॅण्ड , फ्लावर पॉट, अशा वस्तू तयार केल्या होत्या. त्याच बरोबर विविध आकाराचे आकाशकंदील, मुखवटेही तयार केले होते. भिंतीवर शोभणारी सुंदर चित्रे तिने बनवली आहेत. तिच्या या कलेला विदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. एकलव्यासारखी साधना करणाऱ्या तिच्यासारख्या बालकलाकाराच्या हस्तकलांचे कला आणि सांस्कृतिक खाते, कला अकादमी आणि हस्तकला महामंडळाने प्रदर्शन भरवून त्याना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com