Parking Problem |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: मांद्रे, मोरजीत पार्किंग व्यवस्थेचे तीन तेरा

Goa News: किनारी भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याची आग्रही मागणी

दैनिक गोमन्तक

Goa News: मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात आणि मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून वारंवार वाहतुकीची कोंडी केली जाते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने पार्क केली जातात. ‘नो पार्किंग’चा फलक असतानाही तिथेच वाहने पार्क करून वाहतूक कोंडीत भर घातली जाते. संबधित वाहन चालकांवर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.

गजानन शेटगावकर यांनी सांगितले,की मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल या मुख्य रस्त्यांबरोबरच किनारी भागातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने वाहने पार्क केली जातात. वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहन चालकांमध्ये कधी कधी शाब्दिक चकमक घडते.

मोरजी ग्रामसभेत उपसरपंच पवन मोरजे यांनी सांगितले होते,की विठ्ठलदास वाडा न्यू वाडा येथील भाग ‘नो पार्किंग झोन जाहीर केले आहेत. त्यामुळे तिथे वाहने पार्क केली तर वाहतूक खाते, वाहतूक पोलिस कारवाई करतील. तिथे ‘नो पार्किंग’ फलक आहेत. मात्र, काही लोक तिथेच पार्किंग करतात.

पंचायतीकडून परवाने मिळतात कसे?

मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत सरकारने संपादित केलेल्या जागेतही अतिक्रमण करून रेस्टॉरंट व इतर दुकानांची बांधकामे उभारली जात आहेत. त्यांना नियोजित पार्किंगची सोय दाखवणे बंधनकारक आहे.

आणि पार्किंगची सोय असेल तरच त्यांना तो व्यवसाय थाटण्यासाठी परवाना देणे अपेक्षित आहे.मात्र,कसलीही खातरजमा न करता व्यवसायांना परवाने दिले जातात,असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडतो.

"लवकरच ‘नो पार्किंग झोन’ कडे वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.सध्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढला आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवले जाते.परिणामी मनुष्यबळ कमी पडते."

- वीरेंद्र वेळूस्कर, वाहतूक पोलिस निरीक्षक पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT