YIN Book Review: गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क स्पर्धेत सुजाता अन् किरणची बाजी

मराठी व कोंकणी या दोन गटात पार पडली स्पर्धा
Gomantak YIN
Gomantak YINDainik Gomantak

गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क, गोवातर्फे आयोजित केलेल्या अखील गोवा महाविद्यालयीन पुस्तक परिक्षण स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. ही स्पर्धा मराठी व कोंकणी या दोन गटात घेतली गेली. दोन्ही गटात विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

(Gomantak Young Inspirers Network announced the results of book review competition)

Gomantak YIN
Rajesh Pednekar IFFI 2022: ‘वाघ्रो’नंतर आता आणखी एक मोहेंजोदडो' - राजेश पेडणेकर

या स्पर्धेतील कोंकणी गटात प्रथम पारितोषिक गोवा विद्यापिठाची विद्यार्थींनी सुजाता कांबळी हिला प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक दादा वैद्य शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील रेशा चारी हिला प्राप्त झाले असून तृतीय परितोषिक गोवा विद्यापिठातील करिष्मा ताटे हिला प्राप्त झाले.

Gomantak YIN
Goa News: 'समुद्री परिसंस्थेसाठी रांजा मासा महत्त्वाचा' - आदित्य काकोडकर

मराठी गटात प्रथम पारितोषिक सरकारी महाविद्यालय, केपे येथील किरण सुतार हिला प्रात्त झाले. द्वितीय पारितोषिक पि.ई.एस महाविद्यालयातील प्राप्ती गांवकर हिला तर तृतीय पारितोषिक सरकारी महाविद्यालय, खांडोळा येथील दक्षता वेलकासकर हिला प्राप्त झाले. सर्व विजेत्यांशी लवकरच संपर्क साधला जाईल. स्पर्धेचे परिक्षण समिक्षक शैलेंद्र मेहता व प्रा. अद्वैत साळगांवकर ह्यांनी केले. यीन गोमन्तक तर्फे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे विषेश अभिनंदन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com