Goa Traffic Issue  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Issue: राजधानीतील वाहतूक कोंडी कधी सुटणार? पणजी-मिरामार रस्ता दीड तास ठप्प

Goa Traffic Issue: पणजीत मेगा ट्राफिक कोंडी; नोकरदार व वाहनचालक त्रस्त

Ganeshprasad Gogate

Goa Traffic Issue: विकेंड संपवून कामावर रुजू होणाऱ्या नोकरदार वर्गासह वाहनचालकांना पणजीतील ट्रॅफिकने चांगलेच जेरीस आणले.

सकाळी विधानसभेवर जाणारा ST समाजाचा मोर्चा पोलिसांनी मांडावी पुलावर रोखल्याने पुलाचे एक लेन काही तासंतास बंद करण्यात आली होती.

याचा फटका पणजीत येणाऱ्या वाहनचालकांना बसला. पुलाची एक लेन सुरु ठेवत पोलिसांनी काही प्रमाणात वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

मात्र पर्वरी रोड, बस स्टॅन्ड सर्कल, कॅसिनो रोड, मिरामार रोडवर मोठ्या प्रमाणात ट्राफिक झाले होते.

दुपारच्या सत्रात काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र पुन्हा ऑफिस सुटण्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी साधारतः 5 ते 7 च्या दरम्यान राजधानीत मेगा ट्राफिक वाहनचालकांना अनुभवायला मिळाले.

अंदाजे दीड तास मांडवी जुन्या पुलावर वाहने अडकली असून अंतर्गत भागातही वाहनांच्या रांगा लागल्याच्या दिसून आल्या.

मागील काही महिन्यांपासून पणजीत वाहतूक कोंडी नित्य नियमाची बनली असून वाहनचालकांना बराच वेळ वाहतूक कोंडीत घालवावा लागत असल्याची चित्र दिसत आहे.

शनिवारी (03 फेब्रु.ला) संध्याकाळच्या सुमारास लोकोत्सव आणि फिश फेस्टिवल पाहण्यासाठी मिरामर रोडवर लोकांनी गर्दी केल्याने मिरामार सर्कल ते दीवजा सर्कल या मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

काही प्रमाणात बेशिस्तपणे केलेले पार्किंग तसेच स्मार्टसिटीचे अपूर्ण काम याचाही फटका वाहतूक कोंडी होण्यासाठी कारणीभूत ठरत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT