Dabolim Airport: दाबोळी विमानतळाबाबत मुख्यमंत्री सावंत पुन्हा म्हणाले, 'भिवपाची गरज ना'

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील यावेळी विरोधकांनी प्रवासी संख्या घटल्याने दाबोळी घोस्ट विमानतळ होण्याची भीती व्यक्त केली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Dabolim Airport: उत्तर गोव्यात गेल्या वर्षीपासून कार्यान्वित झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे, दक्षिणेतील दाबोळी विमानतळ बंद होणार अशी भीती विरोधी पक्षातील आमदार मागील अधिवेशनापासून व्यक्त करत आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील यावेळी विरोधकांनी प्रवासी संख्या घटल्याने दाबोळी घोस्ट विमानतळ होण्याची भीती व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दाबोळी सुरुच राहिल असे आश्वासन सभागृहाला दिले.

GMR कंपनीचे अधिकारी दाबोळी विमानतळावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय नौदलावर दबाव आणत आहे, असा अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आरोप केला. एमआयए सुरू झाल्यानंतर दाबोळीवर विमानांची संख्या कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने एमआयए कार्यान्वित झाल्यानंतरही दाबोळी विमानतळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही हे विमानतळ सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळ INS हंसाच्या नौदल तळाचा भाग आहे.

मोपा विमानतळाच्या सोयीसाठी दाबोळी विमानतळाचे घोस्ट विमानतळात रूपांतर केले जाईल, असा आरोप विरोधी पक्षनेते, युरी आलेमाव यांनी केला. जानेवारी 2023 मध्ये दाबोळी विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांची संख्या 5095 होती, जी डिसेंबर 2023 मध्ये 3510 पर्यंत कमी झाली, असेही आलेमाव म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी GMR कंपनी दाबोळी विमानतळावर दबाव आणत असल्याचा दावा खोडून काढला. तसेच, खासगी कंपनी असा दबाव आणूच शकत नाही असे म्हणत, दाबोळी विमानतळ बंद होणार नसून, भिवपाची गरज नाही, असे स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com