Panjim  Dainik Gomantak
गोवा

Panjim News: 'त्या' बारमालकावर वरदहस्त कुणाचा? रस्ता रुंदीकरणात जागेचा मोबदला घेऊनही नव्याने बांधकाम सुरू

सांतिनेजमध्ये कायदा पायदळी : शटरवर लावलेली नोटिस काढली

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim News: सांतिनेजमधील हमारा स्कूलजवळ जंक्शनवर रस्ता रुंदीकरणात बारची जागा जाऊनही नूतनीकरणाच्या नावावर बांधकाम केलेल्या बारमालकाने आपले शटरच्याआड डेकोरेटचे काम चालूच ठेवले आहे.

महानगरपालिकेने या दुकानाच्या शटरवर लावलेली नोटीसही बारमालकाने काढून टाकली असून, यावरून आता कायदे फक्त गरिबांसाठीच का? बारमालकाला नक्की कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सांतिनेजमध्ये रस्ता रुंदीकरणात जागा जाऊन आणि त्या जागेचा मोबदला घेऊनही ‘त्या’ बारमालकाने आपला बार हटविला नव्हता. रस्ता रुंदीकरण होईल तेव्हा पाहू, अशा तोऱ्हयात लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने या बारमालकाने आता नव्याने बांधकाम केले आहे.

‘गोमन्तक’ ने ही बाब सतत उजेडात आणली, तेव्हा महानगरपालिकेने त्या बांधकामाविषयी नोटीस चिकटविली. त्यानंतर बारमालकाने काही दिवसांत ती नोटीस काढून टाकली असून, तो बार भाड्याने देण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत.

दरम्यान, गरिबांवर कारवाई करायची म्हटले की महानगरपालिकेची सर्व यंत्रणा हलते, पण धनधांडग्यांच्या केसालाही हातल लावण्यात अधिकाऱ्यांना कमीपणा वाटतो.

लोकप्रतिनिधी आज आहेत उद्या नाहीत, पण कायद्याची पायमल्ली होतेय त्याच्याकडे कोण लक्ष का देत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT