Mapusa News: वकिली पेशा सोडून 'त्या' करताहेत श्‍वानपालन! वाचा म्हापसा येथील व्यावसायिकेची यशोगाथा

शर्वाणी पित्रे यांचा व्यवसाय : ‘शेड्स कॅनल’मध्ये दुर्मीळ परदेशी जाती उपलब्ध
Sharvani Pitre
Sharvani PitreDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News प्राचीन काळात शिकार व राखणदारी हे दोन प्रमुख उद्देश श्वानपालनामागे होते. अलीकडे हौस म्हणून अनेक लोक श्वानपालन करू लागले आहेत. त्यासाठी ते मोठी किंमत मोजून श्‍वान खरेदी करतात.

अशाच आकय-म्हापसा येथील शर्वाणी पित्रे यांना लहानपणापासूनच श्वानांबद्दल प्रेम. आणि याच आवडीचे रूपांतर शर्वाणी यांनी व्यावसायिक श्वानपालनामध्ये केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच, काँग्रेचे नेते राहुल गांधी यांनी शर्वाणी पित्रे यांच्या ‘शेड्स कॅनल’ या कॅनमधून ‘जॅक रसेल टेरियर’ची दोन पिल्ले विकत घेऊन आपल्यासोबत नेली. त्यानंतर शर्वाणी पित्रे व त्यांचे ‘शेड्स कॅनल’ हे कॅनल (कुत्र्यांसाठी असलेले घर) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.

शर्वाणी यांना श्वानांची लहानपणापासूच आवड. त्यातच, यातील व्यावसायिक मूल्य त्यांना समजले. सुरवातीला त्यांनी नोकरी करत श्वानांचे बोर्डिंग व त्यानंतर व्यवसाय सुरू केला. पुढे या व्यवसायात जम बसत गेला. तसे त्यांनी वकिली पेशाला रामराम करीत, पूर्णवेळ श्वानपालनाचा व्यवसाय सुरू केला.

शर्वाणी पित्रे यांना श्वानपालन व्यवसायात कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य आहे. याच जोरावर त्या २००२ पासून या व्यवसायात सक्रियपणे यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांनी दुर्मीळ परदेशी जातींचे श्वान पाळले आहेत. त्यांना मोठी मागणी आहे. या श्वानांच्या पिल्लांची विक्री देशातील विविध भागांत केली जाते.

अशी झाली सुरवात... ः शर्वाणी पित्रे यांचे शेजारी एकेदिवशी आपले श्वान पित्रे यांच्या घरी सोडून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी शर्वाणी यांनी या श्वानांचा उत्तमपणे सांभाळ केला. याच शेजाऱ्यांनी मग शर्वाणी यांना तुम्ही श्वानपालन व्यवसाय करावा, असे सुचविले.

कारण, श्वानांविषयी प्रेम व आवड असल्याने त्या चांगल्या पद्धतीने श्वानपालनाचा व्यवसाय करू शकतील, असा विश्वास शेजाऱ्यांनी शर्वाणी यांना बोलून दाखविला. त्यानुसार, २००५ पासून शर्वाणी या वकिली पेशा सोडून पूर्णवेळ श्वानपालनाचा व्यवसाय सांभाळत आहेत.

Sharvani Pitre
Goa BJP: खासदार सदानंद शेट तानावडे पक्ष कार्यात व्यस्त, दिल्लीहून येताच राज्यात बैठकांचा सपाटा सुरू

‘बॉक्सर ब्रीडर’ प्रजातीस देशात मागणी

  • शर्वाणी यांच्या ‘शेड्स कॅनल’मध्ये विविध जातीचे श्वान आहेत. त्या ‘बॉक्सर ब्रीडर’च्या देशात पहिल्या क्रमांकाच्या विक्रीदार आहेत. त्यांच्या या बॉक्सर प्रजातीस देशात खूप मागणी आहे. अनेक राजकारणी, उद्योजक, बॉलीवूड स्टार, बिझनेसमन टायकून यांनी या प्रजातीची पिल्ले त्यांच्याकडून नेली आहेत.

  • त्याचप्रमाणे जॅक रसेल टेरियर, बिचॉन फ्राईस, माल्टीज, इंग्लिश बुलडॉग, फ्रेंच बुलडॉग, क्वीन्स ब्रीड (वेल्श कॉर्गी) आदी प्रजातींची विक्री केली जाते. विशेषतः ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्याकडे याच क्वीन प्रजातीचे ३० श्‍वान होते. शर्वाणी यांनी युरोपमधून श्‍वानांच्या प्रजातींची आयात केली आहे.

  • शर्वाणी यांचा पूर्णवेळ हा श्‍वान पालन-पोषणातच जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांना खूप कमी वेळ झोपायला मिळतो.

  • श्वानपालन करताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे. ज्यावेळी एखादा श्वान जेवत नाही किंवा त्याने उलटी केल्यास तो आजारी असण्याचे पहिले लक्षण ठरते. त्यावेळी श्वानास त्वरित पशुवैद्यकीय सेवा देणे गरजेचे ठरते.

  • मुळात सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना चोवीस तास चालू हवा. कारण इर्मजन्सी कधीही उद्भवू शकते. त्यासोबत तेथील स्वच्छता महत्त्वाची ठरते. अधिकवेळा आम्ही मडगावला खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे श्वानांना घेऊन जातो, असे शर्वाणी सांगतात.

Sharvani Pitre
Vasco Crime: परेरा यांना अटक न झाल्यास गोवा बंद करु- शिवप्रेमींचा इशारा

श्‍वान भुंकणे, गुरगुरणे, रडणे व इतर देहबोलींसह विविध पद्धतींद्वारे संवाद साधतात. विशेषतः श्‍वान हे निष्ठावन व प्रेमळ असतात. आणि ते घरच्यांना जास्त लळा लावतात.

माझे श्‍वानांसह इतर प्राण्यांवर जीवापाड प्रेम आहे. याच प्रेमापोटी मी या श्वानपालन व्यवसायात उतरले. या व्यवसायात मला कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा आहे.

सोबत माझ्या व्यवयासातील भागीदार (पार्टनर) डॅरीक डॅनियल यांची मला चांगली साथ लाभते.- शर्वाणी पित्रे, शेड्स कॅनल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com