Court Dainik Gomantak
गोवा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 50 हजार रुपये दंडाची शिक्षा

Goa POSCO Court: आरोपी तौफीक कोतूर (बायणा, मुरगाव) याला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: लग्नाचे खोटे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पणजी येथील ‘फास्ट ट्रॅक’ विशेष न्यायालयाने (पॉक्सो) आरोपी तौफीक कोतूर (बायणा, मुरगाव) याला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची ही रक्कम पीडितेला भरपाई म्हणून दिली जाणार आहे. न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अन्वये हा निकाल दिला. मात्र, पुराव्याअभावी कलम ३१३ आणि ५०४ या आरोपांतून आरोपीची सुटका करण्यात आली आहे.

सप्टेंबर २०१५ मध्ये आरोपीची ओळख वास्को येथे ‘सेल्स गर्ल’ म्हणून काम करणाऱ्या पीडितेशी झाली. आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अनेक वर्षे हे संबंध सुरू होते. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिली, परंतु गर्भपात करण्यात आला.

आरोपीने धमकी देऊन गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला होता. जेव्हा आरोपीने लग्नास नकार दिला आणि पीडितेला टाळण्यास सुरुवात केली, तेव्हा १७ जून २०२० रोजी तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

पीडितेच्या मैत्रिणीने आणि एका होमिओपॅथी डॉक्टरांनी दिलेल्या साक्षीवरून हे स्पष्ट झाले की, आरोपी तिला स्वतःची पत्नी असल्याचे सांगून दवाखान्यात घेऊन गेला होता. बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला होता की पीडिता स्वतःहून हॉटेलमध्ये गेली होती.

यावर न्यायालयाने म्हटले की, एखादी स्त्री विश्वासाने पुरुषासोबत हॉटेलमध्ये जाते, याचा अर्थ तिला स्पर्श करण्याचा परवाना पुरुषाला मिळत नाही. प्रेमसंबंधात असलेल्या महिलेलाही स्वतःच्या शरीरावर पूर्ण अधिकार असून ती शरीरसंबंधांना नकार देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirgao Lairai Jatra: 'लईराई' जत्रोत्सवासाठी साखळी बाजारपेठ फुलली, रेडिमेड सोवळ्यांबरोबर भाजीपाला, फळांचीही आवक

Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

Mulgao Mining: मुळगावातील खाणीवरील पावसाळापूर्व काम रोखले, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा

Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

मुंबई इंडियन्सच्या गोटात बदलाचे संकेत, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून डच्चू मिळणार? 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

SCROLL FOR NEXT