M R Ramesh Kumar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

M R Ramesh Kumar: वायुप्रदूषणाचा निसर्गावर विपरित परिणाम

तज्ज्ञांचे मत : गांभीर्याने पाहण्याची गरज; यंदा पर्जन्यमानात झाली 9 टक्क्यांनी घट

दैनिक गोमन्तक

M R Ramesh Kumar: राज्यात सकाळी पावसाळा, दुपारी उन्हाळा, रात्री हिवाळा असा प्रकार सुरू आहे. गेल्या काही वर्षांतील गोव्यातील हवामान पाहता मोठ्या प्रमाणात बदल जाणवू लागले आहेत. राज्यातील तापमानाचा पारा यंदा 39 अंशापर्यंत गेला. यंदा राज्यात पावसात 9 टक्क्यांनी घट झाली. हवामान अभ्यासक तसेच काही शास्त्रज्ञांच्या मते राज्यातील वायुप्रदूषण हेदेखील महत्त्वाचे कारण आहे.

नोव्हेंबरच्या सुरवातीला काही प्रमाणात थंडी सुरू झाली. त्यात ढगाळ वातावरण, पावसामुळे थंडीही गायब झाली. राज्यात एकाच दिवशी 6 इंचाहून अधिक पाऊस बरसला व मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात झाली तर पणजी जलमय होते. तर एकेदिवशी 1 मि.मी. पाऊसदेखील पडत नाही. हे बदल पाहता आताच सावध होणे गरजेचे आहे.

तापमानवाढ चिंताजनक

गोवा राज्य हे समुद्रकिनाऱ्यालगत असलेले राज्य आहे. त्यामुळे उन्हाळ्यात 34 अंश सेल्सिअस तापमान हे सामान्य तापमान मानले जाते. मात्र, मागील साठ वर्षांचा हवामानाचा विचार करता राज्यातील तापमानात 0.5 अंश ते दोन अंश सेल्सिअस वाढ प्रत्येक वर्षी होत आहे. ही प्रत्येकासाठी चिंतेची बाब आहे.

"सततच्या हवामान बदलास वायुप्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे. हरित गृह (ग्रीन हाऊस) सोबतच वाढलेल्या वाहतुकीमुळे कार्बनडायऑक्सायडचे प्रमाण वाढल्याने राज्यात सतत हवामान बदल दिसतो."

- एम.आर. रमेश कुमार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: बालरथ केवळ ३ कि.मीतील विद्यार्थ्यांसाठी

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT