'The Kashmir Files' In Iffi: मुख्यमंत्र्यांनी लॅपिड यांच्या 'त्या' विधानाचा केला निषेध; म्हणाले व्यासपीठाचा...

द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन राजकीय चर्चांना उधाण
 Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak

इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी इफ्फी निरोप समारंभात 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी चित्रपटाला 'वल्गर आणि प्रोपेगेंडा' असे संबोधले आहे. याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज निषेध केला.

(Chief Minister Pramod Sawant today condemned Nadav Lapid statement on the film The Kashmir Files)

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, इफ्फीतील ज्युरी प्रमुख तथा इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाविषयी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. एक कलाकृती म्हणून याकडे पाहणे अपेक्षित असताना प्रमुख ज्युरीने या व्यासपीठावर असे शब्द वापरणे म्हणजे इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा प्रकार असल्याचं ते म्हणाले.

 Pramod Sawant
The Kashmir Files in IFFI 2022: 'द काश्मीर फाईल्स' वरील 'त्या' टिप्पणीचा सिनेकलाकारांकडून पुरता समाचार, म्हणाले....

भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ तसेच एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा या विधानाची गंभीर दखल घेणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. यावर 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटात मुख्य भुमिकेत असणारे अनुपम खेर यांनीनदाव लॅपिड यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत नाराजी व्यक्त केली आहे.

 Pramod Sawant
Kashmir Files Controversy: 'कश्मीर फाईल्स' वरील टीकेवर इस्रायली राजदूतांनी मागितली माफी

याबाबत लॅपिड यांनी माफी मागितली असली तरी, राजकीय स्तरातून यावर प्रतिक्रीया येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, या चित्रपटात एकाच पक्षाचा प्रचार करण्यात आला आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा एका राजकीय पक्षाने गाजावाजा केला. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इफ्फीचे ज्युरी हेड नदाव लॅपिड यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे या वादात राजकीय नेते उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com