Goa Opposition Leaders Summons Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पणजी पोलिसांचा दणका! विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार क्रुझ सिल्वा यांची 'त्या' आंदोलनप्रकरणी चौकशी

Goa Opposition Leaders Summons: नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या घरासमोर २३ फेब्रुवारीला केलेल्या आंदोलनप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांना नोटीस बजावली होती.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या घरासमोर २३ फेब्रुवारीला केलेल्या आंदोलनप्रकरणी पणजी पोलिसांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार दोघांनी स्थानकात हजेरी लावली. युरी यांची सुमारे २० मिनिटे चौकशी करण्यात आली, त्यानंतर सिल्वा यांची चौकशी झाली.

पोलिसांनी बजावलेल्या या समन्सप्रकरणी युरी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पोलिस स्थानकात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांकडे ते बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आपणास आईने समन्स आल्याचे फोनवरून सांगितले, तेव्हा आपणास विधानसभेचे अधिवेशन बोलवले असावे, असे वाटले. पण पोलिसांचे समन्स असल्याचे समजल्यावर राजकीय कारस्थान असल्याचे स्पष्ट झाले.

चौकशी झाल्यानंतर स्थानकाबाहेर येताच युरी म्हणाले, आम्ही कायद्याचा आदर करणारे असून, आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले आहे. सरकारी यंत्रणाचा वापर करून भीती निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यास आम्ही घाबरणार नाही.

बंगल्यावर मोर्चा!

वादग्रस्त कलम ३९ (अ) रद्द करण्यासाठी आमदार वीरेश बोरकर यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले होते. त्यांच्या समर्थनार्थ राणे यांच्या बंगल्यावर मोर्चा नेला होता आणि घरासमोर ठिय्या मांडला होता. रहिवासी क्षेत्रात जमाव जमविणे बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी युरी आलेमाव, क्रूझ सिल्वा, व्हेन्झी व्हिएगस, मनोज परब यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT