Goa News | Shacks  Dainik Gomantak
गोवा

Goa News: आगोंद समुद्रकिनाऱ्यावर शॅक्स उभारणी सुरुच!

Goa News: उत्तर गोव्यात कळंगुट येथे 60 टक्क्यांपेक्षा अधिक शॅक्समालकांनी शुल्क भरलेले नाही.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्यात पर्यटन हंगाम सुरू होऊन एक महिना पूर्ण होत आला असला तरी पर्यटकांचे आकर्षण असलेले शॅक्स अजूनही उभारणे सुरूच आहे. गोव्यात विदेशी पर्यटकांचे अजूनही आगमन झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिकांमध्येही काहीसे निराशेचे वातावरण आहे.

गोव्यात येणाऱ्या बहुतेक पर्यटकांचे वास्तव्य हॉटेलांमध्ये असले तरी त्यांचे खान-पान मात्र शॅक्सवरच होते. त्यामुळे शॅक्स हे गोव्यातील पर्यटनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत. काणकोण तालुक्यातील आगोंद किनाऱ्यावर अजूनही शॅक्स उभारणी सुरू असून सासष्टीच्या किनारपट्टीवरही काही ठिकाणी हे काम चालले आहे.

तसेच, यासंबंधी शॅक्समालक कल्याण संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज यांना विचारले असता, बहुतेक ठिकाणी शॅक्स उभे झाले आहेत. शॅक्स उभारणीस वेळ का लागला, याविषयी ते म्हणाले, मागील दोन वर्षांत कोविडमुळे शॅकचा व्यवसाय व्यवस्थित चालला नाही. त्यामुळे शॅक्समालकांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ती मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यासंबंधीची फाईल वित्त खात्याच्या मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. हे शुल्क कमी होणार याची काही व्यावसायिक वाट पाहात आहेत. काहींनी हे शुल्क अजून न भरल्याने शॅक्स उभारणीस वेळ गेला, असे त्यांनी सांगितले.

4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

4 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढहे शुल्क भरण्याची शेवटची तारीख 2 ऑक्टोबर होती. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक शॅक्समालकांनी शुल्क न भरल्याने आता ही मुदत वाढवून 4 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आल्याची माहिती कार्दोज यांनी दिली. उत्तर गोव्यात कळंगुट येथे 60 टक्क्यांपेक्षा अधिक शॅक्समालकांनी शुल्क भरलेले नाही, अशी माहिती शॅक्स ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT