Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Goa Nightclub Fire Update: गोव्यातील हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

Arpora Goa Nightclub Fire Video

गोव्यातील हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला असून, हणजूण पोलिसांनी संबंधित क्लबच्या चार व्यवस्थापकांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी क्लबच्या मालकाचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आग लागण्याच्या काही सेकंद आधीची परिस्थिती दिसून येते. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे पळापळ सुरू झाल्याचे दृश्य या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

या घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यापैकी २३ जणांचा मृत्यू धुरामुळे गुदमरून झाला असून, दोन जणांचा मृत्यू थेट आगीत भाजल्यामुळे झाला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांपैकी काही जण पर्यटक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT