गोवा

Goa News: 'गोव्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मात्र आमचे मुख्यमंत्री फक्त...'

गोव्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असूनही आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंटमध्येच व्यस्त आहेत, अशी घणाघाती टीकाही विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गोव्यातील बेरोजगारीचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे. गोव्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असूनही आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंटमध्येच व्यस्त आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

काल मडगावातील पत्रकार परिषदेत सरदेसाई म्हणाले, भाजप सरकार युवकांच्या भविष्याशी खेळत आहे. सरकारतर्फे आयोजिलेल्या रोजगार मेळाव्यात सामील झालेल्या 14 हजारपैकी फक्त 557 युवकांनाच ऑफर लेटर मिळतात, ही वस्तुस्थिती आहे. पण सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केवळ इव्हेंट आयोजित करते.

त्यांना फक्त इव्हेंटगिरी करायची आहे. त्यातून ते सरकारचा निधीही वाया घालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार बेरोजगारांची संख्या लपवत आहे. यापूर्वी नीती आयोगाने राज्यातील बेरोजगारीची जी आकडेवारी दिली होती,

तीही खोटी आहे, असे म्हटले होते. पण आकडेवारी लपविली म्हणून बेरोजगारी कमी होणार नाही. बेरोजगारी कमी करायची असेल तर कौशल्य विकास योजना सुरू करण्याची गरज आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या जानेवारी महिन्याच्या आकडेवारीचा दाखला देताना सरदेसाई यांनी देशातील बेरोजगारीची सरासरी 7.1 टक्के असताना गोव्यातील सरासरी 16.2 टक्के असल्याचे सांगितले. देशातील सर्वांत जास्त बेरोजगारी असलेल्या राज्यात गोव्याचा चौथा क्रमांक लागतो, असे सांगून ही चिंता करण्यासारखी बाब असल्याचे सरदेसाई म्हणाले.

बेरोजगारांत महिलांचे प्रमाण अधिक

गोव्यात पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 8.13 टक्के तर महिलांमध्ये 34.3 टक्के आहे. या बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी पर्यटन, खनिज, उत्पादन, बांधकाम आणि मच्छीमारी या क्षेत्रांत कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करावेत,

तर महिलांसाठी फ्रंट ऑफिस असिस्टंट, एडिटिंग, ग्राफिक डिझायनर, स्टोअर साहाय्यक अशा क्षेत्रांत प्रशिक्षण कोर्स सुरू करावेत, अशी सूचना सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT