Goa Carnival: कार्निव्हल काळात पर्यटकांच्या खिशाला कात्री; विमान तिकीटदरात मोठे बदल

विमान कंपन्यांनी कार्निव्हल काळात दुप्पट तिकीट दर आकारले आहेत.
Goa Carnival
Goa CarnivalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Carnival: कोरोना महामारीनंतर राज्यातील पर्यटन उद्योगाची गाडी आता हळूहळू रुळावर येत असून यंदाचा पर्यटन हंगाम जोमात सुरू आहे. त्यातच कार्निव्हल विकेंडला राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक येणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्यातील सर्व हॉटेल्स फुल्ल होण्याची शक्यता आहे. मात्र, विमान कंपन्यांनी ही संधी साधून कार्निव्हल काळात दुप्पट तिकीट दर आकारले आहेत.

शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी पणजीपासून कार्निव्हलची सुरुवात होणार आहे. योगायोगाने त्याच दिवशी महाशिवरात्री असल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात सार्वजनिक सुट्टी असते. मोठा विकेंड असल्याने पर्यटक हमखास गोव्यात येतात.

परिणामी कार्निव्हलसाठी देशी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर हा पहिला कार्निव्हल असेल, ज्याला विदेशी पर्यटकही उपस्थित राहणार आहेत.

कोरोना निर्बंधांमुळे विदेशी पर्यटकांना गेली दोन वर्षे कार्निव्हलमध्ये सहभागी होता आले नव्हते.

Goa Carnival
Goa News: 'गोव्यातील उद्ध्वस्त मंदिरांचे प्रातिनिधिक स्मारक दिवाडी बेटावर उभारणार'

मुंबई-गोवा तिकीट 6 हजारांपेक्षा जास्त

एरवी मुंबई ते गोवा विमान तिकीट सरासरी दीड ते दोन हजार रुपये असते. मात्र, 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान हे दर 4 ते 6 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

19 ते 22 फेब्रुवारी काळात गोवा ते मुंबई मार्गावरील विमान तिकीट 4 ते 6 हजार रुपये झाले आहे. कार्निव्हल विकेंड असल्याने हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com