काणका येथील मिल्टन मार्कीस जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात लक्ष्मी सावंथी (वय ४५, रा. पर्रा) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बांबोळी-शिरदोण फ्लायओव्हरवर शुक्रवारी (१८जुलै ) रात्री ९.३० च्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला. या अपगातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून, इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
राज्यभरात पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टी भागांसह घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली नोंदणीकृत कारचा बागा येथे अपघात झाला असून, काही वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच,कार लोखंडी कचराकुंडीला धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
आजोशी येथे मासेमारी करताना बेपत्ता झालेल्या अनिल कुट्टीकर यांचा शोध घेण्यासाठी आता नौदलाचे अधिकारी पुढे सरसावले आहेत. आगशी पोलिसांच्या मदतीने हे शोधकार्य सुरु आहे.
घरातून अपहरण करण्यात आलेल्या १३ आणि १४ वर्षीय बहिणींचा शोध घेण्यास कुडचडे पोलिसांना यश आले आहे. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी मुलींचा शोध घेऊन सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केले.
वाड्डे यथे गोसावी कुटुंबीयांच्या घराजवळ दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यात कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. बचावकार्य पथक आणि आमदार कृष्णा साळकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरडप्रवण भागात सुरक्षा भिंती उभारण्यासाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पणजी: मेरशी येथील एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने मांडवी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता, वाहतूक पोलिस हवालदार राम सूर्यवंशी यांनी आपल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचवला. मालीम सर्कल येथे कर्तव्य बजावत असताना सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका वृद्ध मातेचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी मेरशी येथील एक ७५ वर्षीय महिला मांडवी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी मालीम सर्कल येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस हवालदार राम सूर्यवंशी यांच्या निदर्शनास ही बाब आली. कोणतीही वेळ न घालवता, सूर्यवंशी यांनी तत्काळ धाव घेत त्या महिलेला वेळीच रोखले आणि तिला आत्महत्येपासून परावृत्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.