
कर्नाटक येथील गुहेत रशियन महिला रहस्यमय पद्धतीने राहत असल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले. याप्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत असताना आता तिच्या पतीने धक्कादायक माहिती सांगितली आहे. महिलेसोबत उद्योगपतीला गोव्यात प्रेम झाले यानंतर दोन मुलींच्या जन्मानंतर मला न सांगता गुहेत राहू लागली, अशी माहिती पतीने दिली आहे.
निना कुटीना नावाची रशियन महिला तिच्या दोन लहान मुलींसह गोकर्ण – कर्नाटक येथील रामतीर्थ गुहेत वास्तव्य करत असल्याचे आढळून आले होते. महिलेची चौकशी केली असता तिने व्हिसा समाप्त झाल्याचे कारण पुढे केले होते. तसेच, आध्यात्माच्या आवडीचा उल्लेख देखील तिने केला होता. याप्रकरणी आता तिच्या पतीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. निनाचा पती ड्रोर गोल्डस्टीन असून, तो इस्त्रायली उद्योगपती आहे.
ड्रोरने पणजी पोलिस स्थानकात २०२४ साली निना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, अशी माहिती समोर आली आहे. यातून या प्रकरणातील खरा ट्विस्ट समोर आला आहे. ऑक्टोबर २०१७ रोजी ड्रोर गोव्यातील हरमल येथे वास्तव्य करत होता. यावेळी त्याचा निनासोबत संपर्क आला. निनाला यावेळी दोन मुले होती. दरम्यान, ड्रोर आणि निना यांच्या जवळीक वाढत गेली आणि त्यांच्यात प्रेम झाले.
मे २०१८ मध्ये दोघांनी इस्त्रायला जाण्याचा निर्णय घेतला पण, निनाचा व्हिसा समाप्त झाल्याने तिला पुन्हा रशियाला पाठविण्यात आले. दरम्यान, निना काहीही माहिती न देता युक्रेनला गेल्याची माहिती ड्रोरने दिली. निनाने ड्रोरला ई-मेलवरुन ती गरोदर असल्याची माहिती दिली. यानंतर ड्रोर आणि निना यांची युक्रेनमध्ये भेट झाली.
दोघांनी कोस्टा रिका येथे काही काळ वेळ घालवला. यानंतर निनाने मुलांसह गोव्यात येण्याचा निर्णय घेतला. तर, ड्रोरला कामानिमित्त पुन्हा इस्त्रायला जावे लागले. २०२० मध्ये निनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. याकाळात ड्रोर त्यांना आर्थिक मदत करायचा अशी माहिती त्यांने पोलिसांना दिली.
निनाच्या पहिल्या पतीपासून असलेल्या मोठ्या मुलाचा २०२४ मध्ये झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन मुलींसह ती गोव्यातच राहू लागली. ड्रोर मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्यास आग्रही होता तर, निनाचा याला सक्त विरोध होता.
यानंतर दोघांमध्ये तणाव वाढत गेला आणि निना ड्रोरला मुलींपासून दूर ठेवू लागली. निना पती ड्रोरला काहीही न सांगता गायब व्हायची, त्यामुळे मुलींचा ताबा आपल्याकडे मिळावा यासाठी ड्रोर कायदेशीर लढाईची तयारी करत होता.
निनाच्या अशा वागण्यामुळे ड्रोरला तिच्या मुलींच्या शिक्षण आणि तब्येतीची काळजी वाटू लागली होती. पण, निना अचानक गायब झाल्याने त्यांचा ठावठिकाणा समजत नसल्याचे त्यांने म्हटले आहे. दरम्यान, त्याने निना मुलींसह बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सध्या कर्नाटक पोलिस निना कुटीना आणि तिच्या दोन मुलींना रशियात पाठविण्याच्या तयारीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.