Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

Goa: नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेश ला रवाना

भाजपचे वरिष्ठ नेते तथा गोव्याचे माजी सभापती व माजी वनमंत्री राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) आज हिमाचल प्रदेश येथे जाण्यास रवाना झाले.

दैनिक गोमन्तक

हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती (Governor of Himachal Pradesh) झालेले भाजपचे वरिष्ठ नेते तथा गोव्याचे माजी सभापती व माजी वनमंत्री राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) आज हिमाचल प्रदेश येथे जाण्यास रवाना झाले. याप्रसंगी आर्लेकर यांना मुख्यमंत्री व गोवा भाजप कडून निरोप देण्यात आला व पुढील कार्य काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आर्लेकर हिमाचल प्रदेशचे २१वे राज्यपाल म्हणून उद्या शपथ घेऊन कार्यभार सांभाळणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (PresidentRam Nath Kovind) यांनी मंगळवारी देशातील आठ राज्याच्या राज्यपाल पदाच्या नियुक्त्या करणारा आदेश जारी केला. यात गोव्याचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाजप नेते राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे. देशातील विविध राज्याच्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपती भवन मधून झाल्यानंतर स्वतः राष्ट्रपतीने फोन करून या निवडी संबंधी माहिती देऊन श्री आर्लेकर यांचे अभिनंदन केले होते.

दरम्यान मुख्यमंत्री व गोवा भाजप कडून आर्लेकर यांना आज सकाळी त्यांच्या झुवारी नगर येथील निवासस्थानी येऊन निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आर्लेकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत भाजप पक्ष संघटनेतील भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस अॅड नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामोदर नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस अल्मेदा, संघटन मंत्री सतीश धोंड आदी उपस्थित होते.

दरम्यान आर्लेकर यांना आज निरोप देण्यासाठी त्यांच्या झुवारी नगर येथील निवासस्थानी त्यांच्या मित्र परिवारांनी सकाळपासून गर्दी केली होती. यावेळी खास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री यांचे त्यांच्या निवासस्थानी पोचल्यानंतर आर्लेकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नंतर ते आपल्या पत्नीसमवेत बारा वाजता सिमला येथे जाण्यास रवाना झाले.तेथून ते हिमाचल प्रदेशला रवाना होणार आहे. यावेळी ते भावुक झ

दरम्यान हिमाचल प्रदेशचे नवनियुक्त राज्यपाल राजन भालेकर यांचा शपथविधी उद्या संपन्न होणार आहे. तेथल माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे देहावसान झाल्यामुळेआर्लेकर यांचा शपथ विधी तीन दिवसाने पुढे ढकलला होता तो आता उद्या पार पडणार आहे.

राजेंद्र आर्लेकर.

राज्यपालपदी नियुक्ती होणे ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची अभिमानाची गोष्ट आहे. या पदावर नियुक्त करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांनी खास करून भारतीय जनता पार्टीने माझ्या योग्यतेचा विचार केला.त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवणार आहे. त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे माझे प्रयत्न त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील.माझ्या कार्याची दखल घेऊन सर्वोच्च पदी झालेली निवड ही गोमंतकीयांचा आर्शिवाद असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाजपचे ज्येष्ठ नेते श्री आर्लेकर यांच्या या निवडीबद्दल आपणास आनंद झाला असल्याचे ते म्हणाले. ही गोव्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून श्री आर्लेकर यांच्या कार्यकाळासाठी आम्ही खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे ते म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती होणे हा गोव्याचा सन्मान आणि प्रत्येक गोमंतकीयांसाठी गौरवपूर्ण आहे. अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी व्यक्त केली आहे.

नगर विकास मंत्री मिलिंद नाईक

राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल गोव्याच्या राजकारणाला बहुमान प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपण आर्लेकर यांचे अभिनंदन करीत आहे. आपल्या आमदार तथा मंत्रिपदाच्या कारकिर्दीत कामाचा ठसा उमटवलेल्या आर्लेकर यांची राज्यपाल निवड झाल्याबद्दल यांचे मनापासून अभिनंदन करतो.

आमदार कार्लोस अल्मेदा

राजेंद्र आर्लेकर हे उत्तम वक्ते व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. आता राज्यपाल म्हणून सुद्धा ते आपली नवी ओळख निर्माण करतील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नव्या वर्षाची दमदार सुरुवात! 1 जानेवारीला 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; पैसा, नोकरी, करिअरमध्ये जबरदस्त यश

Goa Municipal Election: पालिका निवडणुकांसाठी प्रभाग राखीवता तातडीने जाहीर करा, अन्‍यथा न्यायालयात जाणार; विजय सरदेसाईंचा इशारा

'सीआरझेड'मधून मासेमारांना दिलासा द्या, रापोणकर 'सी फूड फेस्टिव्हल'मध्ये मच्छीमार पेलेंची मागणी

Goa Education: पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका 'एससीईआरटी'च तयार करणार! परिपत्रक लवकरच जारी

WPL 2026: जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज; सराव करण्यासाठी खेळाडू गोव्याच्या मैदानात Watch Video

SCROLL FOR NEXT