Goa: नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांचे मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन

या पदाच्या शिष्टाचार व संविधानात्मक मूल्य पाळणे आपल्यासाठी प्राधान्य असेल असं मत हिमाचल प्रदेशचे 21 वे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी व्यक्त केले आहे.
Rajendra Arlekar & Chief Minister Dr. Pramod Sawant
Rajendra Arlekar & Chief Minister Dr. Pramod Sawant
Published on
Updated on

हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) राज्यपालपदी (Governor) गोवा विधानसभेचे माजी सभापती, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. राज्यपाल पद हे पक्षीय पातळीपेक्षा संविधानात्मक पद आहे.

त्यामुळे या पदाच्या शिष्टाचार व संविधानात्मक मूल्य पाळणे आपल्यासाठी प्राधान्य असेल असं मत हिमाचल प्रदेशचे 21 वे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले आहे. हे पद सांभाळताना गोवा विधानसभेत केलेल्या सभापतीपदाच्या कामाचा फायदा नक्कीच होईल. कारण या पदाच्या कामाचे स्वरूपही असेच आहे.

Rajendra Arlekar & Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: सरकारी महामंडळांनी आत्मनिर्भर व्हावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

श्री आर्लेकर यांनी 2012 ते 2015 या दरम्यान गोवा विधानसभेत पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेला असून ते भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. तर 2012 ते 2015 या दरम्यानच्या काळात ते गोवा विधानसभेचे सभापती होते त्यानंतर त्यांनी वन, पर्यावरण, आणि पंचाईत मंत्रालयाचे मंत्री म्हणून काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com