प्रसिद्धीचा स्टंट: GOA राज्यपालांच्या शपथग्रहणाचा हट्टाहास का?

गोव्याचे (Goa) नवे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Governor P. S. Sreedharan Pillai) यांच्या 15 रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास दोनशेहून अधिक जणांना निमंत्रित करण्याची तयारी
Goa Raj Bhavan
Goa Raj BhavanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नवे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 15 रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास दोनशेहून अधिक जणांना निमंत्रित करण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. कोविड महामारीचा काळ अद्याप ओसरलेला नसतानाच कोविड विषाणूला प्रसारासाठी जणू संधीच देण्याचे सरकारने ठरवले आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राजभवनाच्या प्रांगणात जोरदार पावसालाही दाद देणार नाही असा शामियाना उभारण्यास सुरवातही झाली आहे. (200 people invited to the swearing-in ceremony of the new governor of Goa in violation of the Covid protocol)

सर्वसाधारणपणे असा शामियाना उभारून नव्या सरकारचा शपथविधी होतो. राज्यपाल बदलासाठी राजभवनातील दरबार सभागृहाचा वापर केला जातो. क्वचितप्रसंगी एखाद दुसऱ्यास मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठीही शपथविधीसाठी याच सभागृहाचा वापर केला जातो. मात्र, यापुढे येणाऱ्या कोणत्याही कारणाचे निमित्त साधून सरकार काय करते ते भव्यदिव्य हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी नव्या राज्यपालांचा शपथविधी सोहळा शामियाना उभारून करण्याचे सरकारी पातळीवर ठरले आहे.

Goa Raj Bhavan
Goa: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा दुसऱ्यांदा नियोजित दौरा रद्द !

सध्या सत्ताधारी भाजप निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे निमित्त कोणतेही असो ते साजरे झाले पाहिजे आणि त्याची भव्यता जनतेपर्यंत पोचवण्यासाठीची एकही संधी सोडता कामा नये असे सत्ताधाऱ्यांनी मनोमन ठरवल्याचे दिसते. त्यामुळे राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेल्या राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले आहे.

दिमाखदार सोहळ्याचे प्रयोजन काय?

राजभवनाच्या पहिल्या मजल्यावर दरबार हॉल आहे. तेथे शंभर लोकांना सामावून घेतले जाऊ शकते. तसे असतानाही शामियाना उभारून राजभवनाच्या प्रांगणात दिमाखदार सोहळा आयोजित करण्याचे प्रयोजन काय असा सवाल जनमाणसात विचारला जात आहे.

Goa Raj Bhavan
Goa: पेडणेत एकही बेरोजगार युवक उरणार नाही ; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

https://www.youtube.com/watch?v=mwkCQT4JGQk&t=2sअध्यक्षांचा दौऱ्याची कसर भरून काढणार का?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दौरा रद्द झाल्याने भाजपला मिळू शकणारी प्रसिद्धीची संधी गेली आहे. यामुळे राज्यपालांचे जल्लोषात स्वागत करण्याचा बेत रचण्यात आला आहे. सरकारी पातळीवर हे सारे होत असले, तरी याचे दिशादर्शन पक्षाकडून होत असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याला पूर्णवेळ राज्यपाल केंद्र सरकारने दिला. ही केंद्र सरकारचीच आणखी एक कामगिरी आहे हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी शपथविधी सोहळ्याची मदत घेतली जाणार आहे.

"नव्या राज्यपालांचा शपथविधी 15 रोजी होणार असला तरी तो नेमका कुठे करावा याविषयीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. कोविड महामारीचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे."

- अंजू केरकर, संयुक्त सचिव, सर्वसाधारण प्रशासन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com