Goa New Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa New Shack Policy: अखेर शॅकचा प्रश्‍न संपुष्टात, परवान्यांसाठी ठरला 80: 10: 10 चा फॉर्म्युला

Goa New Shack Policy: दीड तास बैठक : 10 दिवसांत काढणार सोडत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa New Shack Policy: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना शॅक्स प्रश्नावर एकत्र आणून शॅक व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढला.

पूर्वीच्या 90: 10 या प्रमेयाऐवजी आता शॅक परवान्यांसाठी 80: 10: 10 असे नवे सूत्र मान्य करण्यात आले आहे.

त्यानुसार 4 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्यांना 80 टक्के, 1 ते 4 वर्षे अनुभवींना 10 टक्के तर नव्या अर्जदारांना 10 टक्के परवाने आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. दीड तास ही बैठक सुरू होती.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत शॅकसाठी आकारली जाणारी अनामत रक्कम घटवून सर्वसंमतीने शॅक धोरण अधिसूचित करण्याचे ठरवले. त्यामुळे येत्या 10दिवसांत शॅक परवाने देण्यासाठी सोडत काढण्याचा पर्यटन खात्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीला पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, आमदार दिलायला लोबो, पर्यावरण सचिव अरुण कुमार मिश्रा, पर्यटन संचालक सुनील अंचीपखा, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ पर्यावरण अभियंता संजीव जोगळेकर, शॅकचालक कल्याण संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज, पारंपरिक शॅकचालक संघटनेचे अध्यक्ष मान्युएल कार्दोज आदी उपस्थित होते.

या बैठकीत ठरवले की, धोरणात सुचवलेल्या 2 लाखांच्या अनामत रकमेऐवजी अ वर्गीय शॅकसाठी 1 लाख रुपये तर ब वर्गीय शॅकसाठी 50 हजार रुपये अनामत शुल्क आकारावे. अनुभवी शॅकचालकांना 90 टक्के तर नव्या अर्जदारांना 10 टक्के परवाने देण्याचे ठरवले होते.

त्याला बैठकीत विरोध करण्यात आला. त्यात बदल करण्यावर मतैक्य झाल्यावर ४ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्यांना 80 टक्के, 1 ते 4 वर्षे अनुभवींना 10 टक्के तर नव्या अर्जदारांना १० टक्के परवाने आरक्षित ठेवण्याचे मान्य केले. तसा बदल धोरणात करण्यात येणार आहे.

नव्या धोरणानुसार पोलाद वा लोखंडी पाईप न वापरता केवळ लाकडी दांड्यांच्या साहाय्याने शॅक उभारावे लागणार होते. आता तेवढे लाकडी खांब मिळणार नसल्याने त्याला बैठकीत विरोध करण्यात आला.

एक शॅक उभारण्यासाठी किमान साठ खांब लागतात ते आणायचे कुठून, असाही प्रश्न विचारण्यात आला. पर्यावरणमंत्री काब्राल यांनी सागरी अधिनियमांतील तरतुदीकडे बैठकीतील सहभागींचे लक्ष वेधले.

कोणत्याही स्थायी पद्धतीने बांधकाम किनाऱ्यांवर करता येत नाही. त्यात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावरही केंद्र सरकारनेच मर्यादा घातल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर ३० टक्के साहित्य हे लोखंडाचे किंवा पोलादाचे वापरण्यासाठी मुभा देण्यावर मतैक्य कऱण्यात आले.

पर्यटन सर्किटची महिनाभरात घोषणा

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी महिनाभरात समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पर्यटन सर्किटची घोषणा केली जाईल, असे जाहीर केले. त्यांनी आज अकराव्या सशक्त समितीची बैठक घेतली.

ते म्हणाले, आमची मंदिरे गोव्याचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतात आणि मंदिराच्या जोडणीमुळे हे सारे जागतिक पर्यटकांसमोर प्रदर्शित करण्यात मदत होईल. आम्ही निरोगीपणा, होम स्टे आणि स्थानिक खाद्यपदार्थांसह पर्यटनाची आध्यात्मिक कथा तयार करत आहोत.

आम्ही अनेक सणांचे आयोजन देखील करत आहोत. गोवा टुरिझम महिनाभरात पर्यटकांना आध्यात्मिक पर्यटन सर्किट जाहीर करणार आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बोलत आलो आहोत.

शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी व्हावी, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. मुख्य महोत्सवाचे आयोजन पर्यटन खाते करणार आहे. आम्ही सहा शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यास सहकार्य करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT