Governor P. S. Sreedharan Pillai: गोवा, केरळ पर्यटनात आघाडीवर; एकत्रित काम केल्यास दोन्ही राज्यांचा फायदा

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे मत
Goa Governor p. s. sreedharan pillai
Goa Governor p. s. sreedharan pillaiDainik Gomantak

Governor P. S. Sreedharan Pillai: केरळ आणि गोवा ही दोन्ही राज्ये पर्यटन क्षेत्रात आघाडीवर आहेत. या दोन्ही राज्यांनी पर्यटन क्षेत्रात एकत्रित काम केल्यास, एकमेकांना सहकार्य केल्यास त्याचा फायदा दोन्ही राज्यांना होईल. लाभाचे असे मार्ग शोधले पाहिजेत, असे मत गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले.

केरळमधील कोलवम येथे सुरू झालेल्या दक्षिण भारतातील प्रतिष्ठित ट्रॅव्हल एक्स्पो ग्लोबल ट्रॅव्हल मार्केट (GTM 2023) च्या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केरळ हे श्री. पिल्लई यांचे गृहराज्य आहे.

Goa Governor p. s. sreedharan pillai
Goa New Shack Policy: शॅक वाटपाचा नवा फॉर्म्युला जाहीर; 80 टक्के शॅक्स अनुभवी व्यावसायिकांना देणार...

राज्यपाल पिल्लई म्हणाले की, “केरळमधील पर्यटन उच्च गुणवत्तेसाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. तर गोव्यातील पर्यटन विविधतेसाठी ओळखले जाते. या दोन्ही पर्यटनस्नेही राज्यातील सहकार्य मजबूत झाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. या संदर्भात दोन्ही सरकारांद्वारे चर्चा सुरू केली जाऊ शकते.”

ते म्हणाले, पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यावहारिक दृष्टीकोन आवश्यक आहे. वाढती मागणी लक्षात घेता इको-टुरिझम, हेल्थ टुरिझम आणि आध्यात्मिक पर्यटन यांना अधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे.

दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता या पर्यटनाच्या दोन मूलभूत गोष्टी आहेत, त्याकडेही दुर्लक्ष होता कामा नये.

Goa Governor p. s. sreedharan pillai
Goa Cyber Crime: पर्वरीतील युवतीची सव्वा लाख रूपयांची फसवणूक; 'फोन पे'वरून 31 ट्रँझॅक्शनद्वारे लुटले पैसे...

यावेळी उपस्थित बांगलादेशचे उच्चायुक्त शेली सालेहीन म्हणाले की, अलिकडच्या काळात उत्तम आरोग्याच्या कारणास्तव वैद्यकीय पर्यटनासाठी बांगलादेशातून केरळला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

मुख्यत्वेकरून दोन कारणांमुळे बांगलादेशातील पर्यटक केरळची निवड करतात. दर्जेदार आरोग्य सेवांची उपलब्धता आणि राज्यातील उच्च पात्र वैद्यकीय व्यावसायिकांची उपस्थिती. याशिवाय केरळच्या लोकांचे आदरातिथ्य हे देखील महत्वाचे ठरते.

ग्लोबल ट्रॅव्हल मार्केट या कार्यक्रमाचे उद्घाटन बुधवारी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते झाले होते. कोवलम येथे चार दिवस हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित लोक एकत्र आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com