37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्याची गुजरातकडून मागणी, आयोजनावर तीव्र टीका

ऑलिंपिक संघटनेला पत्र : खेळाडूंच्या निवास- सोयीसुविधांची कामं रखडली

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games: 25ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान होऊ घातलेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्‍यात होणार की नाही, याविषयी शंका व्यक्त होऊ लागली आहे. आवश्‍‍यक तयारीअभावी ही स्पर्धा पुढे ढकलणेच इष्ठ ठरेल, असे मत गुजरात राज्य ऑलिपिंक असोसिएशन लेखी स्वरूपात भारतीय ऑलिंपिक संघटनेला कळवणार आहे.

पंतप्रधान कार्यालयानेही या स्पर्धेच्या उद्‍घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार की नाहीत, याविषयी अधिकृतरित्‍या राज्य सरकारला कळवलेले नाही.

त्याशिवाय राज्यभरात अनेक क्रीडा संकुलांत सोयी-सुविधा अपूर्ण असून विविध राज्यांकडून आयोजनासंदर्भात विचारणा होत असतानाही त्याबाबतची निश्चित माहिती देण्यास राज्यातील यंत्रणेकडून असमर्थता व्यक्त केली जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाण्याचीच शक्यता सध्या ठळक होताना दिसत आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनास फक्त 20 दिवस उरले आहेत आणि गोव्यातील या स्पर्धेतील तयारीबाबत प्रचंड गोंधळ आहे, आयोजन यशस्वी ठरविण्यासाठी कालावधी अत्यंत कमी असून या कारणास्तव 37 वी राष्ट्रीय स्पर्धा काही महिन्यांसाठी लांबणीवर टाकावी, अशी सूचनावजा मागणी गुजरात राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव आय. डी. नानावटी यांनी केली आहे.

नानावटी यांनी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भात आयओए आणि जीटीसीसी यांना पाठवलेल्या पत्रात बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणतात, की ‘‘स्पर्धेला फक्त 20 दिवस बाकी आहेत. प्रवेशिका पाठविण्यासंदर्भात आयओए किंवा जीटीसीसी यांच्याकडून काही संपर्क संवाद झालेला नाही.

प्रवेशिका कोणाकडे पाठवाव्यात, याचीही माहिती नाही. हे प्रश्न सर्व राज्य ऑलिंपिक संघटना आणि संबंधित राज्य क्रीडा प्राधिकरणांना सतावत आहे. प्रवेशिकांसदर्भात राष्ट्रीय क्रीडा महासंघही अनभिज्ञ आहेत. प्रत्येक खेळासाठी तांत्रिक अधिकारी नियुक्ती, त्यांना किट कोण उपलब्ध करणार?’’

स्पर्धेला फक्त 20 दिवस बाकी असताना विविध राज्यांचे खेळाडू कसे पोहचतील, त्यांचे आरक्षण कोण करणार या साऱ्या प्रश्नांवर जीटीसीसीकडून तोडगा अपेक्षित आहे. मागील राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळेस विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी दररोजी रात्री नऊ वाजता बैठक होत असे, याकडे नानावटी यांनी लक्ष वेधले आहे.

स्पर्धा तोंडावर; पण क्रीडानगरीचा पत्ताच नाही

कांपाल येथील खुल्या मैदानात मोठे तंबू उभारून क्रीडानगरी वसविण्याचे नियोजन आहे; परंतु स्पर्धेला अवघेच दिवस राहिले असतानाही या कामाला अजून सुरवात झालेली नाही. हल्लीच झालेल्या जोरदार पावसामुळे संबंधित कामाचे नियोजन खोळंबले आहे.

तयारीवर इतर राज्ये नाराज

इतर राज्ये गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीवर खूप नाराज आहे. या राज्यांना खेळाडूंचा निवास आणि सुविधा याबाबत प्रश्न सतावत आहेत. गुजरात ऑलिंपिक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच गोव्याला राष्ट्रीय स्पर्धेच्या अनुषंगाने भेट दिली.

या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले नसले, तरी केंद्रीय क्रीडा मंत्रालय व ऑलिंपिक संघटनेकडे गोव्यातील तयारी आणि सुविधांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश ऑलिंपिक संघटनेचे शिष्टमंडळ, तसेच तेथील राज्य सरकारचे अधिकारीही गोव्याला भेट देणार आहेत.

पाहणीसाठी नानावटी गोव्यात

गुजरातमध्ये झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सचिव या नात्याने नानावटी यांनी जबाबदारी यशस्वीपणे पेलली होती. त्यांनी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या गोव्यातील एकंदरित तयारीचा आढावा घेऊन भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष व स्पर्धा तांत्रिक आचार समितीच्या प्रमुखांना पाठवलेल्या पत्राला महत्त्व प्राप्त होत आहे.

उदघाटनापूर्वीच खेळांना सुरवात : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी 19ऑक्टोबरपासून ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन स्पर्धा खेळली जाईल.

22 ऑक्टोबरपासून कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये नेटबॉल स्पर्धा सुरू होईल. शिवाय जिम्नॅस्टिक्स पेडे-म्हापसा येथे, बास्केटबॉल नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी खेळण्यास सुरवात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT