Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Goa Crime News: १०८ रुग्णवाहिकेतून म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: पीर्ण येथे खुल्या पठारावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यू हा मारहानीतून झालेला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोलवाळ पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून, त्याच्या शरीरावर जखमाही आढळून आल्या आहेत. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

उपलब्ध माहितीनुसार, हा युवक रात्री थिवीतून पीर्णच्या पायी जात होता. जाताना काही जणांनी त्याला पाहिले होते. त्यांनतर घटनास्थळी कोणासोबत तरी त्याची झटापट झाली असावी आणि या झटापटीतून त्याला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

येथील पठारावर तो निपचित आढळून आला होता. त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेतून म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा मारहाणीचा प्रकार कोणत्या उद्देशाने झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत. युवकाच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिस खुनाच्या दिशेनही तपास करीत आहेत.

असे असले तरी शवविच्छेदननंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निखिल पालेकर व सहकारी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच घटनास्थळी पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

भीतीचे सावट

या रहस्यमय मृत्यूमुळे पीर्ण व आसपासच्या भागात चर्चेला उधाण आले आहे. पठाराजवळ मद्यपींची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांनी या भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

राज्याबाहेरील मजुरी करण्यासाठी आलेले लोक येथे मोठ्या संख्येने मद्यधुंद अवस्थेत आढळून येतात. त्यामुळे परिसरात गैरप्रकार वाढत असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT