Mother kills daughter Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Goa Murder Case: पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालातून लहान मुलीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pramod Yadav

डिचोली: बॉफ्रेन्डसोबत मिळून आईनेच पोटच्या अडीच वर्षीय मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना म्हावळिंगे, डिचोली येथे उघडकीस आली आहे. नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नसल्याने महिलेने बॉयफ्रेन्डसोबत मिळून मुलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डिचोली पोलिसांनी याप्रकरणी संशयित महिला आणि तिचा बॉयफ्रेन्ड असे दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर मारहाण केल्याचे आढळून आल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी संशयित महिला नगमा (२८) आणि तिचा बॉयफ्रेन्ड नितीन (दोघेही रा. यशवंतनगर, म्हावळिंग, डिचोली मूळ कर्नाटक) यांना अटक केली आहे.

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, नगमाला पतीपासून एक मुलगी होती. दोन वर्षीय ही मुलगी नगमा आणि तिचा बॉयफ्रेन्ड यांना आवडत नव्हती त्यामुळे दोघेही तिचा छळ करत होते. तिला मारहाण करत होते. दरम्यान, तिला खूप मारहाण करुन तिचा खून करण्यात आला. 

पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालातून हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद करुन दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी डिचोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT