Goa Murder Case
Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: गोमेकॉ इस्पितळाच्या डीनला पत्र

दैनिक गोमन्तक

पणजी: नास्नोळा - हणदोणे येथील 19 वर्षीय सिद्धी नाईक हिच्या मृत्युप्रकरणी (Goa Murder Case) संशय व्यक्त करून हत्या झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केल्यानंतर 24 तास उलटण्यापूर्वीच पोलिस तपासकामाला वेगळे वळण लागले आहे. तज्ज्ञ वैद्यकीय मंडळ स्थापन करून शवविच्छेदन अहवालाच्या आधारे नव्याने या अहवालाचे विश्‍लेषणात्मक मत सादर करण्याचे पत्र कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी गोमेकॉ इस्पितळाचे (GMCH) डीनना पाठवून चेंडू त्यांच्या कोर्टात टाकला आहे.

सिद्धीचा अज्ञात व्यक्तीने तिला पाण्यामध्ये बुडवून खून केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणाची दखल महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी घेऊन काल घेतलेल्या बैठकीत तपास अधिकाऱ्यांना वैद्यकीय अहवालाचे पुनरावलोकन करून घेण्याची सूचना केली होती. या पत्रासोबत सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी दिलेल्या तक्रारीची प्रतही जोडण्यात आली आहे. त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची पुन्हा शहानिशा करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.

सिद्धी नाईक हिच्या मृत्युमागे घातपात नसल्याचे सुरुवातीला वाटले होते मात्र तिच्या मृत्युसंदर्भात उपस्थित झालेले अनेक प्रश्‍न तसेच शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर तिची हत्याच झाली असल्याचा संशय बळावला आहे. अज्ञात व्यक्तीने तिला समुद्रकिनाऱ्यावर जबरदस्तीने उथळ पाण्यात तोंड आणि नाकपुड्या बंद होतील अशा स्थितीत ती बुडून मरेपर्यंत दाबून ठेवले. त्यामुळे तिचा घातपात झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीत केलेल्या दाव्यांबद्दल पोलिसांनी गोमेकॉ इस्पितळाचे डीन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे गेले काही दिवस ‘व्हिसेरा’ जपून न ठेवण्यावरून पोलिस व डॉक्टर्स यांच्यात आपापल्यावरील जबाबदारी झटकण्यात येत होती त्याचा पर्दाफाश होणार आहे.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सिद्धी नाईक हिचा मृतदेह हाताळताना व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून अनेक मुद्दे व प्रश्‍न वडील संदीप नाईक यांनी तक्रारीतून मांडले आहेत. ज्या स्थितीत तिचा मृतदेह आढळून आला होता व डॉक्टरांनी दिलेल्या शवचिकित्सेमधील अहवालात विसंगती आहेत. अहवालात तिचे पोट रिकामे होते म्हणजे पोटात पाणी नव्हते. वाळूचे कण स्वरतंतूच्या (व्होकल कॉड) पलीकडे आहेत यावरून ती खोल समुद्रात बुडाली नाही. तिला पोहताही येत नव्हते. तिच्या शरीरातील खुले असलेल्या भागात गेली आहे यावरून ती समुद्रकिनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्यातच बुडाली आहे. पोलिस अहवालात ज्या जखमा आहे त्याची माहिती अगोदर पोलिसांनी उघड केली नव्हती. या जखमा खोलवर नसल्या तरी खरचटलेल्या आहेत. या सर्व बाबी विचारात घेता तिची हत्याच झाली आहे असा दावा त्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

SCROLL FOR NEXT