Goa Murder Case: पोस्टमॉर्टम रिपोर्ट माहित नसल्याने पिडितेचे वडिल अंधारातच

तिच्या हातापायावर जखमा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असताना पोलिसांनी वडिलांना अंधारात का ठेवले?
Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सिद्धी नाईक हिचा शवचिकित्सा अहवाल देण्यास 20 दिवसांचा विलंब तसेच मृत्युमागील कारणे पोलिसांनी उघड न केल्याने संशय अधिक बळावला आहे. ती म्हापसा बसस्टँडवर व त्यानंतर कळंगुट येथे कशी पोहचली? रात्रभर ती कुठे होती? तिच्या हातापायावर जखमा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असताना पोलिसांनी आम्हाला अंधारात का ठेवले? या एकंदर परिस्थितीवरून तिची हत्या झाल्याचा संशय असून सखोल चौकशी करण्याची मागणी सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी केली आहे. पणजीत पत्रकार परिषदेत सिद्धीच्या वडिलांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

12 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सिद्धी नाईक हिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर शवचिकित्सा केली गेली. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या हातापायावर असलेल्या जखमांची माहिती उघड केली नाही. शवचिकित्सा अहवाल म्हणजे काय याचे ज्ञान नसल्यामुळे आम्ही तो मागितला नाही. पोलिसांनीही तो दिला नाही. तिची मानसिक स्थिती सामान्य होती व ती कामावरही जात होती.

Goa Murder Case
Goa Murder Case: कळंगुट पोलिसांचा हलगर्जीपणा

11 ऑगस्टला तिला मी ग्रीन पार्क बसथांब्यावर कामावर जाण्यासाठी बसमध्ये बसविले तर म्हापसा बसस्थानकावर ती कशी पोहचली. ज्या तरुणाने सिद्धीला म्हापसा बसस्थानकावर पाहिल्‍याचे आम्हाला फोन करून दुसऱ्या दिवशी सांगितले त्याने दिलेली माहिती कितपत खरी-खोटी याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तिचे अपहरण करून व तिला रात्रभर कोंडून कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर फेकले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचा कोणावरही संशय नाही मात्र सिद्धी नाईक हिच्या झालेल्या मृत्यूला न्याय द्यावा इतकीच मागणी आहे, असे संदीप नाईक म्हणाले.

माहिती दडवली जात आहे : तारा केरकर

सिध्दीचा मृतदेह गोमेकॉ शवागारात किती वाजता आणला गेला याची नोंद नाही. तिचा मृत्यू 24 तासांपूर्वी झाल्याचा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला आहे, तर तो आदल्या दिवशी दिवसाढवळ्या व्हायला हवा होता, याचे स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्व माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न सुर आहे, असे तारा केरकर म्हणाल्या.

Goa Murder Case
Goa Murder Case: तरूणीच्या वडिलांच्या पोलिस स्टेशनला फेऱ्या

कुटुंबाची बदनामी...

काही वृत्तपत्रांकडून कुटुंबाची बदनामी केली जात आहे. आमच्या घरी कोणतीच हाणामारी झाली नव्हती. तिचा कोणी प्रियकर वगैरे कोणी नव्हता. आमच्याकडे असताना ती क्वचितच मोबाईलवर बोलायची, असे सिद्धीसोबत काम करणाऱ्या तिच्या मावस बहिणीने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com