Goa Murder Case Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: मासेमारीसाठी गेलेल्या ओडिशाच्या कामगाराचा खून, समुद्रात फेकलेला मृतदेह वास्कोत आढळला

Goa Murder Case: पद्मलोचन सलीमा असे या मृत कामगाराचे नाव असून तो 8 जानेवारीपासून बोटीवरून बेपत्ता झाला होता.

Ganeshprasad Gogate

Goa Murder Case: गोव्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यासह देशभरात खळबळ माजत असून धक्कादायक गोष्ट म्हणजे गोव्यात सध्या खुनाच्या मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. अशाच एका घटनेविषयी माहिती हाती येतेय.

मालिम- बेती जेटीवरून मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या ओडिशाच्या कामगाराचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वास्कोतील हर्बर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

पद्मलोचन सलीमा (20, रा. ओडिशा) असे या मृत कामगाराचे नाव असून तो 8 जानेवारीच्या रात्रीपासून बोटीवरून बेपत्ता झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ‘एस्टेला-II’ नामक IND-GA-01-MM-3487 या क्रमांकाची मच्छीमार बोट 8 जानेवारी रोजी मालिम जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीवर कामगारांसह 32 खलाशी होते.

या कामगारांपैकी पद्मलोचन सलीमा (20, रा. ओडिशा) त्याच रात्री बोटीवरून गायब झाला आहे, अशी तक्रार बोटीचा मालक इशान डिसोझा यांनी 10 रोजी पर्वरी पोलीस स्थानकात दाखल केली होती.

या घटनेला अवघे दोन दिवस उलटाच 12 जानेवारी रोजी या पद्मलोचनचा मृतदेह वास्को किनाऱ्यावर हर्बर पोलीस स्थानकाच्या हद्दीत कुजलेल्या अवस्थेत सापडला.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रथम बोटमालक इशान डिसोझा यांना बोलावले. मात्र, ते संबंधित मृतदेह ओळखू शकले नाहीत. त्यामुळे मृतदेह ओळख पटेपर्यंत तो मृतदेह शवागारात ठेवून पोलिसांनी बेपत्ता कामगाराच्या वडिलांना बोलावणे पाठवले.

पद्मलोचनचे वडील आल्यानंतर त्यांनी मृतदेहाच्या पायावरील जन्मखुणेवरून तो मृतदेह बेपत्ता पद्मलोचन याचाच असल्याचे सांगितले.

ओळख पटल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आलीत्याच्या मिळालेल्या अहवालावरून पद्मलोचनच्या छातीवर जोरदार प्रहार झाल्याचे आढळून आले आहे. या अहवालावरून वास्को हर्बर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.‍

गोव्यात 2023 च्या अखेरीस राजवत कुटुंबातील संशयास्पद मृत्यू, 2024 च्या पहिल्याच आठवड्यात सूचना सेठने घेतलेला आपल्या चिमुकल्याचा बळी आणि अगदी काही दिवसांपूर्वीच दीक्षा कटियारचा झालेला दुर्दैवी अंत पाहता गोवा हे गुन्हेगारीचे ठिकाण बनलंय का? प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT