Goa Politics: प्रजासत्ताक दिनानिमित्त गोव्यात काँग्रेसने ध्वजसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
'काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्यांच्यासाठी गांधी परिवार प्रथम, दुसरा पक्ष आणि राष्ट्र सर्वात शेवटी,' अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टीका केलीय.
गोवा भाजपच्या वतीने सोशल मिडिया हँडल 'एक्स'वर गोवा काँग्रेस पक्ष मुख्यालयाबाहेर भारतीय ध्वज फडकवल्याचा फोटो ट्विट केला आहे.
'राम मंदिर प्राणप्रतिष्ठा नाकारणे असो किंवा आता गोव्यात पक्ष मुख्यालयाबाहेर काँग्रेसचा ध्वज भारतीय ध्वजाच्या वरती फडकावून, काँग्रेस वारंवार देशाचा अपमान केला आहे. अशा देशद्रोही पक्षाला लाज वाटायला हवी,' अशा शब्दात भाजपने टीका केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या ट्विटला प्रतिक्रिया देत काँग्रेसवर टीका केली आहे.
'काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्यांच्यासाठी गांधी परिवार प्रथम, दुसरा पक्ष आणि राष्ट्र सर्वात शेवटी,' असे सावंत म्हणाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.