Goa Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: 'हाताची घडी अन् तोंडावर बोट' महापालिका बैठकीचा पत्ताच नाही!

Goa Municipality: महत्त्वाचे ठराव घेऊन ते पुढे कार्यान्वित करण्यासाठी नगरसेवकांची बैठक महत्त्वाची असते.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: सप्टेंबर महिना संपला आणि आता ऑक्टोबर महिना अर्ध्यावर आला, तरीही महापालिकेची मासिक बैठकीचे काही नियोजन होत नसल्याचे दिसत आहे. सत्ताधारी नगरसेवकांना त्याविषयी फारसे गांभीर्य नसले तरी विरोधी गटातील पाच नगरसेवकांची भूमिका ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट'' अशीच असल्याचे दिसू लागले आहे.

शहरात करावयाच्या विकासकामांविषयी चर्चा, त्याचबरोबर प्रशासकीय निर्णय किंवा इतर महत्त्वाचे ठराव घेऊन ते पुढे कार्यान्वित करण्यासाठी नगरसेवकांची बैठक महत्त्वाची असते. सध्या महापालिकेसमोर काहीच विषय नाहीत का की सर्व विषय संपलेत, त्यामुळे बैठकीचा विषयच कोणी काढत नसल्याचे दिसत आहे.

सप्टेंबर महिन्यात महापालिकेची बैठकच झाली नाही, त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे वाटत होते. परंतु आता ऑक्टोबरचे पंधरा दिवस होत आले तरी ही बैठकीविषयी काही चर्चा सुरू झाल्याचेही दिसत नाही. त्यामुळे स्थायी समिती सदस्य नक्की काय करतात, हाही प्रश्‍न आहे.

विरोधी गटातील नगरसेवकांना विचारणा केली असता, त्यांनी महापौरांना याबाबत विचारा असे सांगितले जाते. तर सत्ताधारी स्थायी समितीच्या सदस्यांनाही याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते. काही आठवड्यांपूर्वी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विकासकामांविषयी आढावा बैठक घेतली होती, त्यावेळी शहरातील अनेक विकासकामांचा लेखाजोखा पुढे आला होता.

त्यामुळे महापालिकेच्या बैठकीत हे विषय पुढे येतील असे वाटत होते. परंतु बैठक आता केव्हा होणार हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. गाड्यांची संख्या वाढली असून शहरात सध्या अनेक ठिकाणी पाणीपुरीचे गाडे लावले जात असल्याचे चित्र आहे. यापूर्वी हटविलेल्या गाड्यांचा प्रश्‍न सुटलेला नाही. परंतु हे गाडे कोणाच्या परवानगी लागले, याची चर्चा सुरूआहे.

दहा दिवसांनंतर होईल बैठक

महापालिकेची बैठक होण्यास विलंब का, याविषयी विचारणा केली असता महापौर रोहित मोन्सेरात यांनी `गोमन्तक’ला सांगितले, दहा दिवसांनी ही बैठक होईल. अद्याप बैठकीचा अजेंडा तयार झालेला नाही, परंतु या महिन्यात ती होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT