Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn In Goa: ग्रामसभांत खाण, सनबर्नला विरोध, मुळगाव- आगरवाडा ग्रामसभा गाजल्या

Sunburn In Goa: सनबर्न पार्टी ही किनारी भागातील विकृती गावा-गावांत पोचल्यास युवकांचे भवितव्य बरबाद- अमोल राऊत

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn In Goa: मुळगावात आज (रविवारी) झालेल्या ग्रामसभेत पुन्हा खाणीला, तर आगरवाडा-चोपडेच्या ग्रामसभेत मोपा येथे होणाऱ्या सनबर्न पार्टीला विरोध दर्शविण्यात आला.

मुळगावातील ग्रामसभेत पुन्हा खाण विषयावर चर्चा झाली. विविध मुद्यांवरून ग्रामस्थांनी खाणविरोधी भूमिका घेतली. बफर झोन आणि गावाला मारक ठरणारे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत खाणीला समर्थन देऊ नका.

पंचायत किंवा अन्य ग्रामसंस्थांनी खाण कंपनीशी कोणतीही चर्चा करू नये, अशी सूचना ग्रामसभेत करण्यात आली.

माजी सरपंच वसंत गाड यांनी तसा ठरावही मांडला. त्याला उपस्थितांनी मान्यता दिली. खाणीसाठी तयार केलेला पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल गावासाठी अन्यायकारक असल्याचे वसंत गाड यांनी सांगितले.

मुळगावची ग्रामसभा सरपंच तृप्ती गाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच गजानन मांद्रेकर, विशालसेन गाड, मानसी कवठणकर आणि पंचसदस्य उपस्थित होते.

सनबर्न विषयावर आगरवाडा- चोपडेचे सरपंच ॲन्थनी फर्नांडिस म्हणाले की, मी या प्रस्तावित पार्टीविषयी पूर्णत: अनभिज्ञ आहे.

मुळगाव वगळा!

खाणसंबंधी पुन्हा जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पुन्हा संधी मिळाल्यास मुळगावमधील लोकांनी जनसुनावणीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून खाण लीज क्षेत्रातून हे गाव वगळावे, अशी मागणी करण्याचे ठरले. खाणप्रश्नी गावात जागृती करतानाच लोकांनीही संघटित राहावे, अशी सूचना पुतूलो गाड यांनी केली.

...तर युवकांचे भवितव्य धोक्यात

रविवारी झालेल्या आगरवाडा-चोपडेच्या ग्रामसभेत मोपा विमानतळ परिसरातील प्रस्तावित सनबर्न पार्टीला ग्रामसभेत विरोध करण्यात आला. काहींनी या पार्टीचे समर्थनही केले, तर काहींनी मौन बाळगणे पसंत केले.

यावेळी माजी सरपंच अमोल राऊत यांनी सनबर्न पार्टीचा प्रश्न उपस्थित करून किनारी भागातील ही विकृती गावा-गावांत पोचल्यास युवकांचे भवितव्य बरबाद होईल.

त्यामुळे पेडण्यात ही पार्टी नकोच, असे सांगितले. मात्र, उपस्थितांपैकी काहींनी युवकांना रोजगार प्राप्त होणार असेल तर त्याला विरोध नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: "सोसायटी शोधायची तर चिटणीस वा अध्यक्ष शोधावा लागतो", गोव्यात सहकार क्षेत्र बळकट करणं का गरजेच?

Panaji Air Quality: पणजीत श्वास घेणं म्हणजे दिवसाला किमान दोन सिगारेट ओढणं? वाचा धक्कादायक रिपोर्ट

Saint Francis Xavier Exposition: शवदर्शन सोहळ्यासाठी येताय? गोवा पोलिसांनी जारी केलेली नियमावली वाचा

Goa Today's Live Update: मायकल लोबोंना आम्ही रोखू शकत नाही; मांद्रेतून लढण्याबाबत कळंगुट सरपंच सिक्वेरांचे वक्तव्य

Delhi Goa Flight: लज्जास्पद! प्रवासादरम्यान विमानात महिलेसमोर आक्षेपार्ह कृत्य, विकृतास अटक

SCROLL FOR NEXT