Goa Politician गिरीश चोडणकर यांनी वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर माझे नाव दाबोळीच्या आमदारांसोबत जोडून चुकीची माहिती पसरवली असून माझी राजकीय कारकिर्द संपविण्याचा कट रचला आहे.
माझे नाव बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात वास्को पोलिस स्थानक तसेच पणजीतील सायबर सेलमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक धक्का बसल्याचा दावा चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांनी केला आहे.
चिखली येथे पत्रकार परिषदेत कोरगावकर म्हणाल्या की, चोडणकर यांनी माझ्यावर वृत्तपत्रांत व सोशल मीडियावर अश्लील आरोप करून पंतप्रधान कार्यालय व इतर ठिकाणी खोट्या तक्रारी केल्या आहेत.
खरे तर मी चोडणकर यांना ओळखतही नाही. असे असतानाही त्यांनी माझे नाव दाबोळीच्या आमदारांसोबत जोडून माझी बदनामी केली. एका महिलेची अश्लील माहिती आणि फोटो सोशल मीडियावर टाकणे पूर्णत: चुकीचे आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर दाबोळीचे आमदार तथा मंत्री माविन गुदिन्हो तसेच चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांचे नाव बदनाम केल्याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकात दाबोळी-वाडे येथील रहिवासी नेहाल दामोदर केणी यांनी तक्रार दाखल केली आहे.
जाहीर खुलासा करा!
सांकवाळ जिल्हा पंचायत सदस्य तथा नारी शक्तीच्या सदस्य ॲड. अनिता थोरात म्हणाल्या की, महिला सशक्तीकरणाविरोधात हे षडयंत्र रचले आहे. ऐश्वर्या कोरगावकर या अभियंता असून त्यांचे नाव वृत्तपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम केले आहे.
ज्यांनी कोणी कोरगावकर यांचे नाव दाबोळीच्या आमदारांसोबत जोडून त्यांची बदनामी केली, त्यांनी जाहीररित्या खुलासा करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.