Mulgao Mining Dainik Gomantak
गोवा

Mulgao Mining: मुळगावातील खाणीवरील पावसाळापूर्व काम रोखले, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा

Mulgao mine pre-monsoon work protest: प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुळगाव येथील खाणीवर हाती घेतलेले पावसाळापूर्व कामाला मुळगाववासीयांनी अडथळा निर्माण करून काम रोखून धरले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुळगाव येथील खाणीवर हाती घेतलेले पावसाळापूर्व कामाला मुळगाववासीयांनी अडथळा निर्माण करून काम रोखून धरले आहे. हे काम करण्याचे निर्देश देण्यापूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा दावा करून मंगळवारी (ता.१४) सायंकाळी मुळगाववासीयांनी खाणीवर धडक देत पावसाळापूर्व काम बंद पाडले. बुधवारी (ता.१५) सायंकाळपर्यंत हे काम बंद होते.

दरम्यान, पावसाळापूर्व काम रोखल्यानंतर बुधवारी सकाळी मुळगावात पोलिस गस्त ठेवण्यात आल्याने मुळगाववासीयांमध्ये खळबळ माजली होती. काही वेळानंतर पोलिस माघारी फिरले. पावसाळ्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार कंपनीने मंगळवारपासून मुळगाव येथील खाणीवर पावसाळापूर्व काम हाती घेतले होते.

याची कुणकूण लागताच सायंकाळीच स्थानिकांच्या एका गटाने खाणीवर धाव घेऊन काम रोखून धरले. देवस्थानचे अध्यक्ष कृष्णनाथ परब, कोमुनिदादचे महेश्वर परब, शेतकरी समितीचे प्रकाश परब आदींनी खाणीवर धडक दिली होती. काम रोखून धरताच खाण कंपनीने कळविल्यानंतर पोलिसही खाणीवर दाखल झाले. जोपर्यंत उपजिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती मिळत नाही. तोपर्यंत काम सुरू करण्यास देणार नाही, अशी भूमिका मुळगाववासीयांनी घेतली आहे.

स्थानिकांच्या विरोधामुळे मुळगाव येथील खनिज खाण गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे पावसाळापूर्व काम करताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, असा मुळगाववासीयांचा दावा आहे.

तोडगा काढण्‍यासाठी बैठक

या पेचप्रसंगावर तोडगा काढण्‍यासाठी शुक्रवार, १७ रोजी सकाळी १० वा. डिचोली उपजिल्‍हाधिकारी कार्यालयात ग्रामस्‍थ व कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलविण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT