Goa Viral Video: 'त्या' व्हिडिओप्रकरणी युवक जेरबंद, क्राईम ब्रँचची यूपीत कारवाई; व्हिडिओ व्हायरल केल्याचा ठपका

Titos Lane foreign woman video: शरीरसुखाची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याला गोवा गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत.
goa foreign woman video
goa foreign woman videoDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : बागा येथील टिटोस लेन परिसरात एका परदेशी महिलेशी कथित अश्लील वर्तन आणि शरीरसुखाची मागणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याला गोवा गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ साहनी (वय ४८) असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे.

सोशल मीडियावर एका यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही अज्ञात व्यक्ती बागा येथील टिटोस लेन जवळ एका महिलेशी अश्लील भाषेत बोलताना आणि तिची छेड काढताना दिसून येत होत्या. या घटनेची गंभीर दखल घेत गोवा पोलिसांनी स्वेच्छा दखल घेत गुन्हा दाखल केला होता.

goa foreign woman video
Goa IPL Betting Racket: गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त, सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा; 6 जणांना रंगेहाथ पकडलं VIDEO

सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आणि ‘प्रिझम’ युनिटने या व्हिडिओचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासात हा व्हिडिओ सौरभ साहनी याच्या आयडीवरून अपलोड झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे एक पथक लखनौमध्ये दाखल झाले आणि तिथून सौरभला ताब्यात घेऊन गोव्यात आणले.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ७५ आणि ७९, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ आणि ६७-अ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या घटनेतील पीडित परदेशी महिलेचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवला असून, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर सह-आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक तुषार लोटलीकर आणि उपनिरीक्षक अमीन नाईक यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

goa foreign woman video
Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

‘व्ह्यूज’साठी व्हिडिओ शेअर केला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने कबुली दिली आहे की त्याने १९ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आपल्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्राइबर्स वाढवण्यासाठी त्याने १२ एप्रिल २०२६ रोजी हा व्हिडिओ अपलोड केला. मात्र, त्यावर कमी व्ह्यूज आल्याने त्याने तो स्वतःच्या फेसबुकवरही शेअर केला. विशेष म्हणजे, पीडित महिलेची ओळख लपवण्यासाठी त्याने तिचा चेहरा ‘ब्लर’ देखील केला नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com