उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Usgao-Ganje House tax: उसगाव-गांजेच्या ग्रामसभेत घरपट्टी शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा ठराव संमत झाला.
 Usgao-Ganje House tax
Usgao-Ganje House taxDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : उसगाव-गांजेच्या ग्रामसभेत घरपट्टी शुल्कात कपात करण्याचा महत्त्वाचा ठराव संमत झाला. रविवारी झालेल्या या ग्रामसभेत वाढीव घरपट्टीच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

सरपंच राजेंद्र नाईक यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान सरपंच व पंचमंडळाने ग्रामस्थांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

पंचायत क्षेत्रातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी घरपट्टी शुल्कात कपात करण्याबाबतचा ठराव माजी सरपंच दत्ताराम प्रभू आणि तुळशीदास गाड यांनी संयुक्तपणे मांडला. त्याला ग्रामस्थांनी हात उंचावून अनुमोदन दिले.

या विशेष ग्रामसभेला पंच गोविंद परब फात्रेकर, रेश्मा मटकर, वैभवी गावडे, संजय ऊर्फ प्रकाश गावडे आणि नरेंद्र गावकर उपस्थित होते.

 Usgao-Ganje House tax
EPFO New Rule: नोकरी सोडली तरी पीएफवर व्याज मिळते? ईपीएफओच्या 'या' नियमामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

ग्रामस्थांना मोठा दिलासा

ठरावानुसार चिरेबंदी कौलारू घरांसाठी प्रति चौरस मीटर ५ रुपये, तर चिरेबंदी स्लॅब घरांसाठी प्रति चौरस मीटर १० रुपये या दराने घरपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

घरपट्टी शुल्काबाबत आतापर्यंत चार ग्रामसभा आणि एक विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या.

उपस्थित ग्रामस्थांच्या आग्रहास्तव २०२६-२७ या वर्षासाठी घरपट्टी शुल्कात अर्ध्याहून अधिक कपात करण्याची मागणी मंजूर करण्यात आली. त्यासंदर्भात ग्रामसभेत अधिकृत ठरावही संमत करण्यात आला.

यामुळे आगामी वर्षात पंचायतीकडून घरपट्टीची आकारणी पूर्वी वाढविण्यात आलेल्या दराच्या अर्ध्याहून कमी दराने करण्यात येणार आहे. तसेच गावातील निराधार विधवा आणि विधुरांच्या घरांवरील घरपट्टी शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com