Cynthia Fernandes  Dainik Gomantak
गोवा

अपघाताने कुटुंब हिरावलं, पैशाची चणचण, जमीनदाराचा जाच, मोरजीतील सिंथिया जगतेय हालाखीचं आयुष्य

जगतेय एकाकी जीवन : तिच्या मागचं दुर्दैवाचं दशावतार संपणार कधी?

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim News: मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदासवाडा किनारी भागातील सिंथिया मोनिका फर्नांडिस या युवतीने चार वर्षांपूर्वी एका अपघातात आपले पूर्ण कुटुंबच गमावले. चोपडे-शिवोली पुलावर हा अपघात झाला होता.

त्‍यात आई, वडील व भाऊ ठार झाल्‍यामुळे सध्‍या सिंथिया ही एकाकी जीवन जगत आहे. विशेष म्‍हणजे त्‍यांची आर्थिक स्‍थिती खूपच हलाखीची असून घरावर नीट छप्परही नाही.

त्‍यास गळती व वाळती लागलेली आहे. घरदुरुस्‍ती करण्‍यास, शौचालय उभारण्यास जमीनदार हरकत घेतो. त्‍यामुळे सर्व बाजूंनी त्‍यांची परवड सुरू आहे.

गोवा मुक्त होऊन साठ वर्षांचा काळ लोटला तर देश स्वातंत्र्य होऊन ७७ वर्षे उलटली. मात्र आजही कुणाला शौचालय नाही, राहण्यासाठी घर नाही, छप्पर नाही हे सांगितले तर तो संशोधनाचा विषय ठरेल.

पण या स्‍थितीत सिंथिया मोनिका फर्नांडिस आपले जीवन कंठत आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्‍या अपघातात तिच्‍या डोळ्‍यासमोर अख्ख कुटुंब उद्‌ध्‍वस्‍त झालं होतं. आज दुःख झेलत असताना जीवन जगावं म्हणून ती जगत आहे.

न्यायासाठी तिचा लढा सुरू आहे. परंतु अजून तरी कोणालाही तिची दया आलेली नाही. केवळ निवडणुका आल्या की उमेदवार येतात, मत मागून निघून जातात आणि निवडून आल्यावर साफ दुर्लक्ष करतात.

जीव मुठीत घेऊनच काढावी लागते रात्र :

माणुसकीच्या नजरेतून तिला शेजारी मदत करतात. परंतु हे किती काळ चालणार? रात्रीसुद्धा जीव मुठीत घेऊन झोपावं लागतं. रात्री-अपरात्री जमीनदार आपले सुरक्षारक्षक तिच्‍या घराजवळ आणून ठेवतो.

तिला आधार मिळावा यासाठी एक शेजारी बाई तिच्यासोबत रात्रीच्‍या वेळी गेली चार वर्षे नियमितपणे झोपायला येते. त्‍यामुळे तिला थोडा धीर मिळतो.

परंतु सरकारने तिला साथ का दिली नाही? असा सवाल उपस्थित करण्‍यात येत आहे. स्थानिक आमदार जीत आरोलकर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची गंभीर दखल घेऊन एकाकी जीवन जगत असलेल्या सिंथिया हिला आधार द्यावा, तिच्‍या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

प्रसाधनगृहासाठी आडोसा करायलाही हरकत

सिंथिया फर्नांडिस हिच्‍या घरावर नजर मारल्‍यास तिच्‍या‍वर ओढवलेल्‍या परिस्‍थितीची कल्‍पना येईल. जमीनदार भाटकार शौचालय उभारण्यास घरदुरुस्ती करण्यास आडकाठी आणतो. बाजूला कपडे वाळत टाकले तरी ते फेकून देतात.

आंघोळीसाठी आडोस करण्‍याकरिता चुडते लावली तरी ती काढून फेकून दिली जातात. मग शौचालयाची सोय कशी करावी? त्‍यासाठी सिंथियाला शेजारच्‍या घराचा आधार घ्‍यावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Updates: वाळपई विठ्ठलमय

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

SCROLL FOR NEXT