Deputy Chief Minister Babu Kavalekar inspecting the flood-hit area with Locals, Goa. on Saturday, 24 July, 2021. (Goa) Tukaram Sawant / Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत पुरामुळे 3 कोटींहून अधिक हानी

घरे, शेती-बागायतींची नासधूस, पूरस्थिती नियंत्रणात (Goa)

तुकाराम सावंत

डिचोली: पावसाचा जोर कमी झाल्यानंतर डिचोलीतील (Bicholom) पूरग्रस्त स्थिती नियंत्रणात येत असली तरी पूरग्रस्त पुराच्या तडाख्यातून सावरलेले नाहीत. अद्यापही पूरग्रस्तांच्या डोळ्यांसमोर पुराचे दृष्य तरळत आहे. त्यांच्या बोलण्यातून तसे दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूने पुराच्या तडाख्यात तालुक्यात करोडो रुपयांची हानी झाली आहे. घरे आणि शेतीची मिळून नेमकी नुकसान झाले, ते नुकसानीचा अहवाल तयार झाल्याल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, तरी हा आकडा 3 ते 5 कोटीपर्यंत असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी काल पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर पूरग्रस्त भागातील (Flooded area) नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Deputy CM Babu Kavalekar) यांनी शनिवारी सभापती पाटणेकर यांच्यासह साळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी तालुक्यातील हरवळेसह अन्य पूरग्रस्त भागांची पाहणी केली. (Goa)

The bridge over the Sal Dam came to near Collapse

करोडो रुपयांची हानी

पावसाच्या रौद्रावतारानंतर काल पहाटे तालुक्यातील साळसह, हरवळे पिळगाव, सुर्ल, चावडी, कुडणे आदी बहूतेक भागांना पुराचा तडाखा बसला. पैकी साळ आणि हरवळे भागात सर्वात ज्यास्त तडाखा बसला. साळ, हरवळे, सारमानस आदी भागात घरांमध्ये पाणी घुसले (Inter flooded water in Houses). त्यात घरांतील सामानाची नासधूस झाली. हरवळे भागात घरांची पडझडही (Houses Collapsed) झाल्याचे निदर्शनास आले. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे साळ बंधाऱ्यावरील (Sal Dam) पादपुल यंदाही मोडकळीस आला आहे. सखल भागात पाणी घुसल्याने शेती-बागायतींची नासाडी झाली (Farm field waste). शेतीतील तरवा कुजण्याची शक्यता वाढली आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूरग्रस्त भागातील घरांमध्ये चिखल आदी कचरा साचल्याने पूरग्रस्तांसमोर (Flooded People) चिखल साफ करण्याचे आव्हान आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कृषी खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी शनिवारी पूरग्रस्त साळ भागाला धावती भेट दिली. लवकरच साळमधील पूरग्रस्तांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभापती राजेश पाटणेकर त्यांच्यासमवेत होते. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय (आयएएस) यांनी शनिवारी हरवळेसह सुर्ल आदी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय (आयएएस), डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित आदी उपस्थित होते. पुराचा तडाखा बसताच मुख्यमंत्र्यांसह सभापती राजेश पाटणेकर आणि आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल विविध भागांना भेट देवून पूर स्थितीचा आढावा घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT