Rohan Khaunte  Dainik Gomantak
गोवा

Sunburn In Goa: 'म्युझिकल इव्हेंटच्या तालावर सरकार नाचणार नाही, कार्यक्रमातून चुकीचा संदेश नकोच' - खंवटेंचा सज्जड इशारा

मोपा येथे फेस्टिव्हल: आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

Rohan Khaunte राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘सनबर्न फेस्टिव्हल’बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. यंदा हा महोत्सव मोपा विमानतळ येथे होणार असल्याची चर्चा असली, तरी त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

काही पंचायतींनी आयोजनास विरोध केला आहे, तर काही पंचायतींनी त्यासाठी पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे आयोजकांनी गोव्यातील ‘सनबर्न’च्या तारखा जाहीर करून तिकीट विक्री सुरू आहे. यामुळे हा सनबर्न महोत्सव नेमका कोठे होणार यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत आयोजकांच्या तालावर सरकार नाचणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

मंत्री खंवटे म्हणाले की, कोणताही म्युझिक फेस्टिव्हल असो, याबाबतच्या विविध खात्यांच्या परवानग्या घेण्याची एक पद्धत तयार करण्यात आली आहे.

त्यामुळे कोणताही महोत्सव करण्यापूर्वी त्यासाठीच्या परवानग्या आयोजकांनी घेणे क्रमप्राप्त आहे, परंतु तसे न होता ऐनवेळी परवानग्यांच्या फाईल सादर केल्या जातात आणि गोंधळ निर्माण होतो.

त्यामुळे गोवा सरकार आणि मंत्री म्हणून मी तरी कुठल्याही म्युझिकल इव्हेंटच्या तालावर नाचणार नाही. मंत्री खंवटे पुढे म्हणाले, की गोव्यात पहिल्यांदाच एखादा महोत्सव होतोय असे नाही, पण जे लोक अशा फेस्टिव्हलचे आयोजन करत आहेत, ते आपण सरकारला त्यांच्या तालावर नाचवू असा विचार करत आहेत, पण तसे होणार नाही.

काही पंचायतींचा याला विरोध आहे, तर काही  पंचायतींनी  त्याला पाठिंबा दिला आहे. मी माझी भूमिका  मुख्यमंत्र्यांकडे  मांडणार आहे. गतकाळात आयोजकांबाबत तक्रारीही आल्या होत्या.

पर्यटकांना चुकीचा संदेश जाऊ नये

सनबर्न आयोजकांनी घोषणा केली असेल, तर त्याची माहिती त्यांनाच असेल. याचा विचार गोवा सरकार करत बसणार नाही. गोवा सरकार त्यांच्या तालावर नाचायला तयार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे.

मोपा विमानतळ येथे सनबर्न फेस्टिव्हल होण्याबाबतच्या बातम्या समोर आल्या आहेत. मी याबाबत माझे मत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे.

मोपा विमानतळाचा अधिकाधिक विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण तिथे होणाऱ्या एखाद्या कार्यक्रमातून आणि ठिकाणाच्या वादावरून पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जाता कामा नये, असेही खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT