Goa Monsoon
Goa Monsoon Sandip Desai
गोवा

Goa Monsoon Update: दिलासादायक! पावसाचे इंचांचे 'शतक' पूर्ण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon Update राज्यात २२ जूनपर्यंत गायब झालेल्या पावसाने पुढील ३४-३५ दिवसांत धमाल उडविली. त्यापैकी २७ दिवसांत पडलेल्या अतिरिक्त पावसाने यंदा इंचाची शंभरीही लवकरच गाठली.

गेला आठवडाभर पावसाने उसंत घेतली असली, तरी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पडणाऱ्या सरींनी आज अखेर १००.१० इंचाची नोंद केली.

प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘अल निनो’मुळे यंदा केरळात ८-९ दिवस उशिरा मॉन्सून दाखल झाला. मात्र, देशभरात सक्रिय होण्यासाठी त्याला फारसा वेळ लागला नाही. राज्यात पावसाने ११ जूनला हजेरी लावली खरी.

मात्र, त्यानंतर दडी मारली. दरम्यान, याच नैऋत्य मॉन्सून मार्गावर आलेल्या चक्रीवादळामुळे मॉन्सून मार्गात अडथळे आले आणि पाऊस बंद झाला होता. हीच अवस्था २०-२२ जूनपर्यंत राहिली.

राज्यातील काही धरणांसह विहिरी, नद्या, नाले, कोरडे पडले होते. राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली. पाण्यासाठी जलस्त्रोत खात्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याची पळापळ सुरू झाली होती.

या दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि मध्य भारतात तयार झालेला भूखंडीय ऑफशोर टर्फ यामुळे मॉन्सूनचा वेग पुन्हा वाढला आणि २३ जूनपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. पुढे २७ जुलैपर्यंत राज्यात मॉन्सूनची सक्रिय हजेरी राहिली. या ३४-३५ दिवसांमधील ७ दिवस वगळता २७ दिवस अतिरिक्त पाऊस पडला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT