Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम

गोव्यातील (Goa) म्हापसा, पेडणे, साखळी आणि सत्तरी या भागात सर्वाधिक पाऊस पडला.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) राज्याच्या बहुतेक भागांत शुक्रवारी जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी तुरळक सरींसह संततधार सुरूच होती. गेले दोन दिवस केवळ 5 ते 6 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. शुक्रवारी ती नोंद 22.7 मि. मी. इतकी झाली. (Goa Monsoon Update: Chance of rain for next three days)

नेहमीप्रमाणे उत्तर गोव्यातील तालुक्यात पहाटेपासून संततधार सुरू होती. उत्तर गोव्यात 30.5 मि.मी. तर दक्षिण गोव्यात 15.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हापसा, पेडणे, साखळी आणि सत्तरी या भागात सर्वाधिक पाऊस पडला. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.

Monsson Update

981.6 मि. मी. पावसाची नोंद

पावसाने शुक्रवारी वेगळाच आकड्यांचा खेळ साधला. विशेष म्हणजे पावसाने सरासरीशी बरोबरी साधली आहे. 2 जुलैपर्यंतची राज्याची सरासरी 982.2 इतकी आहे. शुक्रवारअखेर राज्यात 981.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी 6 टक्के अधिक असलेला पाऊस सरासरीच्या (शून्य टक्के) बरोबर आला. दुसरी बाब, म्हणजे उत्तर गोव्यात पाऊस सरासरीच्या 9 टक्के अधिक असताना दक्षिण गोव्यात उणे 9 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT