Goa: भोम-मोप येथे एकाचा खून; परिसरात खळबळ

गोव्यातील (Goa) भोम मैदानाजवळ असलेल्या कच्‍च्या रस्त्यावर संध्याकाळी एकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.
Crime in Goa
Crime in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: गोव्यातील (Goa) सक्राळ-तोरसे येथील चंद्रकांत बांदेकर या 55 वर्षीय नागरिकाचा मृतदेह भोम मैदानाजवळ असलेल्या कच्‍च्या रस्त्यावर आज संध्याकाळी सापडल्याने या परिसरात खळबळ उडाली. बांदेकर यांच्या अंगावर, छातीवर धारदार हत्यारांनी वार करण्‍यात आले आहेत. मृतदेह दृष्टीस पडल्यानंतर पेडणे पोलिसांना कळविण्यात आले. (A man was killed near Bhoma ground in Goa)

पेडणेचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी बांदेकर यांची जीए-11-एफ-7142 क्रमांकाची स्कूटर सापडली आहे. चंद्रकांत यांनी हेल्मेट परिधान केले होते, तर त्यांची दुचाकी मृतदेहाशेजारी उभी होती.

Crime in Goa
Goa: मोपा विमानतळ प्रकल्पात कंपनीचा हालगर्जीपणा

चंद्रकांत बांदेकर हे सक्राळ-तोरसे येथे रेती व्यवसाय करत होते. पोलिसांनी मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठविला आहे. खून झाला त्‍या ठिकाणी दुपारी आतील रस्त्याच्या बाजूला दहा-पंधराजण असल्याची चर्चा असून, अनेकांनी त्यांना पाहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Margao Stray Dogs Survey
Goa beach shack law constitutional validity
Goa Dairy management takeover by NDDB
Goa High Court Varca Panchayat Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com