Goa Monsoon Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: राज्यात कहर! पावसाने पार केला 120 इंचाचा पल्ला

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पणजीसह संपूर्ण राज्याला झोपडून काढले आहे.

Kavya Powar

Goa Monsoon Update: सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पणजीसह संपूर्ण राज्याला झोपडून काढले आहे. काही दिवसांपासून मंदावलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यात पावसाने 120 इंचाचा पल्ला ओलांडला आहे.

पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हवामान खात्याद्वारे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत एकूण 19.8 मि.मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 3067 मि.मी म्हणजे 120.65 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत 4.2 टक्के अधिक पाऊस पडला आहे.

या आठवड्यात योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही तर पिकांवर संकट ओढविण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली होती. हा पाऊस शेतीसाठी, खासकरून भात शेतीस पोषक असल्याने शेतकऱ्यांसाठी चतुर्थी सण सुखवार्ता देणारा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Human Animal Conflict: नेमकं हद्दीत घुसलंय कोण? माणूस की हत्ती?

Anganwadi: 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्‍युइटी, पीएफ, पेन्‍शनसह टॅबही द्यावा'! श्रीपाद नाईकांना निवेदन सादर

GCA: जीसीएच्या कर्मचाऱ्यांचा बोलका जल्लोष; क्रिकेट क्लबांनी शिकवलेले शहाणपण

Mhadei River: ‘म्हादई’ केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, सांस्कृतिक वारसा! नदीच्या पैलूंचे सखोल दर्शन घडवणारे पुस्तक प्रकाशित

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

SCROLL FOR NEXT