Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: काजूगट्टो गावाला जोडणारा पूल गेला वाहून! धुव्वाधार पावसामुळे नागरिक हैराण

परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे.

Kavya Powar

Goa Monsoon Update 2023: परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. पावसाने उच्चांक गाठला असून अनेक ठिकाणी पडझड होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुसळधार पावसामुळे काजूगट्टो गावाला जोडणारा एकमेव रस्ता पाईपने बांधलेला पूल वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

लोकांनी स्वतःचे पैसे खर्चून पाईप बसवून पाण्याच्या प्रवाहावर पूल बनवला होता. ग्रामस्थांनी ही परिस्थिती आमदार सुभाष फळदेसाई यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच रस्त्याची ही प्रलंबित मागणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, काल कुशावती नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पारोडा पुलावरून पाणी वाहत होते.

तर उत्तर गोव्यातील मये-कालवी हा रेल्वे क्रॉसिंग मार्ग देखील पाण्याखाली गेला आहे. तर केपे मडगाव रस्त्यावर पाणी आल्याने सदर रस्त्यावरून होणारी वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT