Goa Dairy Cattle Feed Plant: कर्जामुळे गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प काही अटींवर सरकारच्या ताब्यात देण्यास दूध संस्थांच्या अध्यक्षांनी शनिवारी गोवा दूध महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता दिली.
ही आमसभा कुर्टी येथील सहकार भवनात झाली. गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, सदस्य डॉ. रामा परब, संदीप परब पार्सेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
गोवा डेअरीच्या व्यवहारातील टीडीएस भरणा करण्यास उशीर झाल्याने डेअरीला संबंधित खात्याने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. टीडीएस भरण्यास उशीर झाल्यामुळेच हा दंड आकारण्यात आला असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून हा दंड वसूल करावा, असा निर्णय आमसभेत घेण्यात आला
मागच्या काळात पशुखाद्य प्रकल्पासाठी नाकारलेल्या बिलांचे पैसे अदा केलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निलंबन झालेल्या अधिकाऱ्याकडून जमा-खर्च अहवाल सादर करण्यात आल्याने त्यासंंबंधीही आक्षेप घेण्यात आला. गोवा डेअरीत काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात काहीजणांना कामावर घेण्यात आले आहे, तर काहीजण निलंबित आहे.
यासंबंधी गोवा डेअरीने गांभीर्याने लक्ष घालून ९० दिवसांत अशी प्रकरणे निकाली काढावी, अशी सूचना दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी आमसभेत केली, ती मान्य करण्यात आली.
डेअरीकडून दूध उत्पादकांना गुरांसाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध करताना दोन पशुवैद्यकांची नियुक्ती करण्याची मागणी आमसभेत केली.
त्यालाही मान्यता दिली असून सध्या उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन पशुवैद्यक चिकित्सा करणाऱ्या मोबाईल व्हॅन सरकारकडून घेण्यासंबंधीचा पत्रव्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली.
साडेसात कोटींचा तोटा
गोवा डेअरीचा एकूण नुकसानीचा आकडा ७ कोटी ६८ लाखांवर घसरला असून पुढील काळात डेअरी नक्कीच नफ्यात येईल, असा विश्वास प्रशासकीय समितीने व्यक्त केला.
पाच तास चाललेल्या या आमसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषयांवर गरमागरमी झाली; पण ते विषय सामोपचाराने मिटवण्यात आले. या आमसभेला १६६ पैकी ९४ दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पशुखाद्य प्रकल्पामुळेच नुकसान
गोवा डेअरीला म्हारवासडा - उसगावातील पशुखाद्य प्रकल्पामुळेच तोटा होत असून दूध प्रकल्पातील निधी पशुखाद्य प्रकल्पाला द्यावा लागत असल्याने हा तोटा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सद्यस्थितीत पशुखाद्य प्रकल्प बंदच असून तो चालवण्यासाठी सरकारकडे देण्यात येणार आहे. पशुखाद्य प्रकल्पामुळे एकूण तोटा ७ कोटी ६८ लाख रुपये झाला असून मागील काळातील तोटा आता बराच कमी झाला आहे.
पशुखाद्य प्रकल्पामुळेच नुकसान
गोवा डेअरीला म्हारवासडा - उसगावातील पशुखाद्य प्रकल्पामुळेच तोटा होत असून दूध प्रकल्पातील निधी पशुखाद्य प्रकल्पाला द्यावा लागत असल्याने हा तोटा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सद्यस्थितीत पशुखाद्य प्रकल्प बंदच असून तो चालवण्यासाठी सरकारकडे देण्यात येणार आहे. पशुखाद्य प्रकल्पामुळे एकूण तोटा ७ कोटी ६८ लाख रुपये झाला असून मागील काळातील तोटा आता बराच कमी झाला आहे.
तीन पर्याय
गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प तोट्यात चालत असल्याने गेले दोन महिने तो बंदच आहे. हा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी तीन पर्याय निवडले.
त्यात पशुखाद्य प्रकल्पाला लागणारा कच्चा माल सरकारने उपलब्ध करून द्या, दुसरा सरकारच्या ताब्यात हा प्रकल्प द्यावा किंवा तिसरा पर्याय म्हणजे खासगी आस्थापनाकडे हा प्रकल्प देण्याबाबतचा विचार विद्यमान प्रशासकीय समितीने केला व सरकारकडे तसा पत्रव्यवहार केला.
पण सरकारने आधी प्रकल्प ताब्यात द्या, अशी सूचना केली. प्रकल्पाचा विषय आमसभेत ठेवला असता दूध उत्पादक संस्थांच्या अध्यक्षांनी काही अटींवर हा प्रकल्प सरकारला चालवायला द्यायला मान्यता दिली. सध्या बंद असलेल्या प्रकल्पातील 26 कामगारांना डेअरी आस्थापनात सामावून घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.