Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात आज रेड अलर्ट, पुढील तीन तास मुसळधारेचे इशारा

Goa Monsoon 2024: गोवा हवामान खात्याने ११ ते १३ जुलै या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Pramod Yadav

गोव्यात हवामान खात्याने आज (मंगळवार, 09 जुलै) रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील एक ते तीन तास दोन्ही जिल्ह्यात मुसधार पाऊस कोसळण्याची शक्यता गोवा हवामान खात्याच्या वेध शाळेने वर्तवली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, उद्या म्हणजेच १० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

११ ते १३ जुलै या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आज रेड अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात पुढील एक ते तीन तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रासह दक्षिण आणि उत्तर गोव्यावर सध्या पावसाचे ढग असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पाणी साचण्याची अथवा पूर सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच, पाणी साचण्याच्या घटनामुळे परिसरातील वाहतुकीचा आथावा घेतल्यानंतरच बाहेर पडा अशी सूचना हवामान खात्याने केली आहे.

गेल्या चोवीस तासांत उत्तर गोव्यातील पेडण्यात सर्वाधिक १९२ मिमि पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल म्हापसा ११५.२ मिमि, मुरगाव ९३.६ मिमि, दाबोळी ८९ मिमि आणि पणजीत ८७.६ मिमि पावसाची नोंद झाली. सांगे तालुक्यात सर्वात कमी ३९.६ मिमि पावासाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

Pandit Jawaharlal Nehru: आधुनिक भारताचे शिल्पकार! पंडित नेहरुंची 'ती' अखेरची इच्छा; मृत्युपत्रातील उदात्त भावना वाचून तुमचेही पाणावतील डोळे

Belagavi-Goa Highway Accident: बेळगाव-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ओव्हरटेकच्या नादात 2 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

SCROLL FOR NEXT