Dam  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब; हंगामातील 85 टक्के पाऊस जुलैमध्येच!

धरणांतून विसर्ग सुरू: पावसाने मोडला 67 वर्षांचा विक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Monsoon राज्यात यंदा उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने जुलै महिन्यात अनेक विक्रम मोडले. एकूण हंगामातील 85 टक्के पाऊस एकट्या जुलैमध्ये झाला, तर जुलैमध्ये धरणे भरण्याचा 67वर्षांचा विक्रम यंदाच पावसाने मोडला.

यंदा राज्यातील बहुतांश धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यात साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी, गावणे यांचा समावेश आहे. या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.

अंजुणे ८३ टक्के भरले असले, तरी त्याची मूळ क्षमता पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये १ जूनच्या दरम्यान दाखल होणारा मॉन्सून यंदा ९ जूनला आला आणि राज्यात तो ११ जूनला दाखल झाला. दोन जुलैपर्यंत अवघ्या २३ दिवसांत मॉनसूनने सारा देश व्यापला.

याबाबत ज्येष्ठ मॉन्सून तज्ज्ञ डॉ. रमेश कुमार म्हणाले, राज्यात पाऊस ११ जूनला दाखल झाला, तरी प्रत्यक्षात २३ जूनपासून तो सुरू झाला आणि २८ जूनला पावसाने हंगामातला उच्चांक गाठत १४२.५ मि.मी. इतकी हजेरी लावली.

आत्तापर्यंत १९२९.३ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना २४७२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली, तरी पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि ऑफशोर टर्फ यामुळे येत्या २ ते ३ दिवसांमध्ये पुन्हा पावसाला सुरवात होईल, अशी शक्यता डॉ. रमेश कुमार यांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या जुलै महिन्याने पावसाचे ६७ वर्षांचे अनेक विक्रम मोडले. जुलै महिन्यात या हंगामातला ८५ टक्के पाऊस झाला, तर १८ ते २७ जुलै या ९ दिवसांत ४३ टक्के पावसाची नोंद झाली.

पावसाचे अद्यापही ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने बाकी आहेत. २३ जून ते २७ जुलैमधील ३० दिवसांमध्ये अतिरिक्त पाऊस पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT